Multibagger Stocks : स्टॉक असावा तर असा! पाच वर्षात 17 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती
Multibagger Stocks : पाच वर्षांपूर्वी अवघ्या 17 रुपयांचा असलेल्या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
Multibagger Penny Stocks : अनेकजण पेनी स्टॉक्समध्ये काही काळासाठी गुंतवणूक करतात. मात्र, काही पेनी स्टॉक्स (Penny Stocks) काही काळात चांगला परतावा देतात. सोलर एनर्जीशीसंबंधित असलेल्या एका कंपनीने अवघ्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. पाच वर्षापूर्वी पेनी स्टॉक असलेल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 3317 रुपये आहे.
पेनी स्टॉकची खरी मजा खरेदी-विक्रीत नसून शेअर होल्ड करण्यात आहे, असे म्हणतात. त्यामुळे, शेअर बाजार तज्ज्ञ अनेकदा नवीन शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी स्टॉक निवडल्यानंतर ‘खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा’ हे धोरण स्वीकारण्याचा सल्ला देतात. यासह, गुंतवणूकदाराला लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट इत्यादीसारखे दीर्घकालीन फायदे मिळतात.
पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या कंपनीचे नाव वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी (Waaree Renewable Technologies Ltd.) आहे. वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजी लिमिटेडचा शेअर हा मल्टिबॅगर शेअरपैकी एक आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने चांगलाच परतावा दिला आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या शेअरधारकांसाठी पैसे कमावून देणारा स्टॉक राहिला आहे. या कालावधीत मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 195 पटीने वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्या गुंतवणुकीचे मूल्य 1.95 कोटी रुपये झाले असते.
>> कंपनीच्या शेअर दरात कशी वाढ झाली?
> मागील एका महिन्यात या मल्टिबॅगर स्टॉकची किंमत 1,816.50 रुपयांहून वाढून 3317 रुपये प्रति शेअर इतक्या पातळीवर पोहचला. याचाच अर्थ कंपनीच्या शेअर दरात एकाच महिन्यात 80 टक्के वाढ झाली.
> मागील सहा महिन्यापूर्वी वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीचा शेअर दर हा 1444.25 रुपये इतका होता. त्यानंतर सध्या 3317 रुपये प्रति शेअर इतका दर झाला आहे.
> मागील एक वर्षापूर्वी या शेअरची किंमत 495.50 रुपये इतकी होती. या शेअर दरात एका वर्षात 550 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
> मागील पाच वर्षात वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीचा शेअर हा 17 रुपयांहून वाढून 3317 रुपये प्रति शेअर इतक्या पातळीवर पोहचला आहे. याचा अर्थ मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर दरात 19,400 टक्क्यांची वाढ झाली आहे.
>> असं बनवलं करोडपती
> जर आपण वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीच्या शेअर्सच्या किमतीचा इतिहास पाहिला तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये महिनाभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्या शेअर्सचे मूल्य 1.80 लाख रुपये झाले असते.
> जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे मूल्य 2.25 लाख रुपये झाले असते.
> जर एखाद्या गुंतवणूकदाराने डिसेंबर 2023 च्या शेवटी या ऊर्जा स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये सध्या 1.50 रुपये झाले असते.
> त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य 6.50 लाख रुपये झाले असते.
> त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर आज त्या एक लाख रुपयांची किंमत 1.95 कोटी झाले असते.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजाराविषयक गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)