(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jio : रिलायन्स जिओच्या नफ्यात 12 टक्क्यांची वाढ, कंपनीचा नफा पाच हजार कोटीच्या पुढे
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीनं मोठा नफा मिळवला आहे.
Mukesh Ambanis : चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीनं मोठा नफा मिळवला आहे. या कंपनीचा नफा सुमारे 12 टक्क्यांनी वाढून 5,058 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4 हजार 518 कोटी रुपये होता.
देशातील सर्वात मोठ्या खासगी टेलिकॉम कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात बंपर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच तिमाहीत रिलायन्स जिओच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 4 टक्के झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्याने 5 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
नफ्यात 12 टक्क्यांची वाढ
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत मुकेश अंबानींची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा नफा सुमारे 12 टक्क्यांनी वाढला आहे. हा नफा 5,058 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4 518 कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीशी तुलना केल्यास कंपनीच्या नफ्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 4,863 कोटी रुपये होता.
महसुलात जवळपास 10 टक्क्यांची वाढ
रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या महसुलात सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 9.8 टक्क्यांनी वाढून 24,750 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 22,521 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीशी तुलना केल्यास दुसऱ्या तिमाहीत 3 टक्के वाढ दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 24,042 कोटी रुपये होता.
जर आपण कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनबद्दल बोललो तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ते 0.10 टक्क्यांनी वाढले आहे. ते सध्या 26.4 टक्के झाले आहे. कंपनीच्या नफ्यात 0.40 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या ते आता 17.40 टक्के झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या EBITDA मध्ये कोणताही बदल झाला नाही. तो फक्त 52.3 टक्के राहिला. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या EBITDA मध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.