एक्स्प्लोर

1 BHK चं भाडं 4 लाख, केस कापण्यासाठी 5000 रुपये, जगातील सर्वात महागडी शहरं कोणती? 

तुम्हाला जगातील सर्वात महागडं शहर (Most expensive cities) कोणतं? याबाबत माहिती आहे का? या शहरात राहण्यासाठी तुम्हाला 1 BHK घराचं भाडे 4 लाख रुपये द्यावे लागते.

Most expensive cities : तुम्हाला जगातील सर्वात महागडं शहर (Most expensive cities) कोणतं? याबाबत माहिती आहे का? या शहरात राहण्यासाठी तुम्हाला 1 BHK घराचं भाडे 4 लाख रुपये द्यावे लागते. तर केस कापण्यासाठी तुम्हाला 5000 रुपये द्यावे लागतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. लेटेस्ट मर्सर्ज 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रवासासाठी देखील हाँगकाँग हे जगातील सर्वात महाग शहर आहे.

बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल आणि इतर राज्यांतील लोक जे कामाच्या शोधात दिल्ली किंवा मुंबईला जातात त्यांना वाटते की तेथे राहण्याचा खर्च खूप जास्त आहे.  भारतात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु ही शहरे महाग आहेत. परंतू जगभरातील महागाईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांबद्दल तुम्हाला माहित आहे का? पाहयुता सविस्तर माहिती.

हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर 

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, बाहेरुन काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर आहे. त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंडची चार शहरे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. यामध्ये झुरिच, जिनिव्हा, बासेल आणि बर्न या शहरांच्या नावांचा समावेश आहे. टॉप 30 मध्ये भारतातील एकाही शहराचे नाव नाही.

हाँगकाँगमध्ये 1 BHK साठी द्यावे लागतात 2.25 लाख ते 4.4 लाख रुपये

हाँगकाँगमध्ये राहण्याच्या खर्चावर काही संशोधन केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. उदाहरणार्थ, शहरातील एका चांगल्या ठिकाणी 1 बेडरूमचे अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 20,000 ते 35,000 HKD (Hong Kong Dollar) द्यावे लागतील. भारतीय चलनात ते अंदाजे 2.25 लाख ते 4.4 लाख रुपये आहेत. एक हाँगकाँग डॉलर भारतीय चलनाच्या 10.70 रुपये इतका आहे.

दुधाची किंमत 270 ते 320 रुपये प्रति लिटर 

हाँगकाँगमध्ये, एक लिटर दुधाची किंमत 25 ते 30 HKD (हाँगकाँग डॉलर) आहे. म्हणजे भारतीय चलनात दुधाची किंमत सुमारे 270 ते 320 रुपये प्रति लिटर आहे. ब्रँडेड जीन्स पँटसाठी तुम्हाला 5,300 ते 10,500 रुपये मोजावे लागतात. 

जगातील सर्वात महागडी शहरं कोणती?

1.हाँगकाँग 
2. सिंगापूरचा 
3. ज्यूरिख 
4. जिनिव्हा
5. बासेल
6. बर्न 
7.न्यूयॉर्क, अमेरिका
8. लंडन, इंग्लंड
9. नासाऊ, बहामास
10. लॉस एंजेलिस, यूएसए
11. कोपनहेगन, डेन्मार्क
12. होनोलुलु, अमेरिका
13. सॅन फ्रान्सिस्को, यूएसए
14. बांगुई, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक
15. दुबई, संयुक्त अरब अमिराती
16. तेल अवीव, इस्रायल
17. मियामी, अमेरिका
18. जिबूती, जिबूती
19. बोस्टन, अमेरिका
20. शिकागो, अमेरिका
21. N'Djamena, Chad
22. वॉशिंग्टन, डी.सी., यू.एस
23. शांघाय, चीन
24. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
25. बीजिंग, चीन
26. कोनाक्री, गिनी
27. अटलांटा, यूएसए
28. सिएटल, यूएसए
29. पॅरिस, फ्रान्स
30. आम्सटरडॅम, नेदरलँड

केस कापण्यासाठी 5000 रुपये 

हाँगकाँगमध्ये केस कापण्यासाठी देखील मोठी रक्कम खर्च करावी लागते. केस कापण्यासाठी, तुम्हाला 5000 रुपयापर्यंतचा खर्च करावा लागतो. या ठिकाणी औषधांचा खर्च देखील मोठा आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget