Most Expensive Cars : जगातील सर्वात महागड्या कार; किंमत ऐकून थक्क व्हाय!
रोल्स रॉयसने (Rolls Royce) जगातील सर्वात महागडी कार बाजारात आणली. रोल्स रॉयस बोट टेल असे या कारचे नाव आहे. या सुपरकारची किंमत 28 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 202 कोटी रुपये आहे.
Expensive Cars : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचे आहे. जगातील सर्वात महागड्या कारबद्दल विचारले तर अनेकांना माहिती नसेल. जगातील सर्वात महागड्या कारची किंमत काय आहे आणि कोणत्या कंपनीने त्या बनवल्या आहेत. याबद्दल आज माहिती घेऊयात. मुंबईसारख्या शहरात अलिशान बंगल्याच्या किंमतीपेक्षा महागड्या या कार आहेत.
Rolls Royce Boat Tail
काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी रोल्स रॉयसने (Rolls Royce) जगातील सर्वात महागडी कार बाजारात आणली आहे. रोल्स रॉयस बोट टेल असे या कारचे नाव आहे. या सुपरकारची किंमत 28 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 202 कोटी रुपये आहे. या सुपर लक्झरी कारची लांबी 19 फूट आहे. बोट टेल कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.
Best Electric Bikes : भारतात उपलब्ध असलेल्या दमदार इलेक्ट्रिक बाईक, काय आहेत फीचर्स?
Bugatti La Voiture Noire
जगातील सर्वात महागड्या कारबद्दल बोलायचे झाले तर बुगाटीची Bugatti La Voiture Noire कार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची किंमत 19 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 146 कोटी रुपये आहे. या कारमध्ये 1500 हॉर्सपॉवरचे अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. या कारचे इंटीरियर आणि डिझाइन आकर्षक आहे. या सुपर लक्झरी कारची टॉप स्पीड 380 किमी/तास आहे.
Automatic Cars : ऑटोमॅटिक कार चालवताना 'या' चुका टाळा, फायदा होईल
Pagani Zonda HP Barchetta
Pagani Zonda HP Barchetta ही जगातील तिसरी सर्वात महागडी कार आहे, ज्याची किंमत सुमारे 125 कोटी रुपये आहे. अतिशय अलिशान डिझाईन असलेली ही कार 0 ते 100 किमीचा वेग अवघ्या काही सेकंदात पकडते. या कारची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. वेगाबद्दल बोलायचे झाले तर या कारची टॉप स्पीड 355 किमी प्रतितास आहे.