एक्स्प्लोर

Mhada Lottery 2025 : म्हाडाचा धमाका सुरुच, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमधील 1418 घरांसाठी अर्ज मागवले,घरांच्या किंमती 12 लाखांपासून पुढे सुरु

Mhada Lottery 2025 : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मंडळाकडील 1418 घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज नोंदणीला प्रारंभ झाला आहे.

मुंबई: म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1 हजार 418 निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा 'गो लाईव्ह' शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आला.म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे आदी उपस्थित होते.  

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 164 सदनिका,20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 39 सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 63 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 04 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 1148 सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता 266 सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता 04 सदनिकांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजी नगर व नाशिक मंडळाच्या संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी 12.00 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरनाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेण्याकरिता दि. 11 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. दि. 11 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. दि. 12 ऑगस्ट, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दिनांक दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे  स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.  

सोडतीत सहभागी होण्यासाठी  IHLMS 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तसेच सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे मोबाइल ऍप स्वरुपात देखील उपलब्ध आहे. अर्जदार अँड्रॉइड (android) फोन मध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) प्रणालीच्या  अॅप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी केले आहे.

मंडळाचे मुख्य अधिकारी आवळकंठे यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस  मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. हक्काचे घर घेऊ इच्छिनार्‍या अर्जदारांना ही सुवर्णसंधी असून अधिकाधिक नागरिकांनी या सोडतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन आवळकंठे यांनी केले आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Teli joins Shinde Camp Shivsena: दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
ठाण्यावरुन बोरिवलीला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचवणाऱ्या बोगद्याबाबत महत्वाची अपडेट, सरकारने एमएमआरडीएला 210 कोटी रुपये पाठवले
मुंबईकरांचा वेळ वाचणार, ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत गाठता येणार? दुहेरी बोगद्याबाबत मोठी अपडेट
US Vs India : ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Teli joins Shinde Camp Shivsena: दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
ठाण्यावरुन बोरिवलीला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचवणाऱ्या बोगद्याबाबत महत्वाची अपडेट, सरकारने एमएमआरडीएला 210 कोटी रुपये पाठवले
मुंबईकरांचा वेळ वाचणार, ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत गाठता येणार? दुहेरी बोगद्याबाबत मोठी अपडेट
US Vs India : ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 ऑक्टोबर 2025 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 ऑक्टोबर 2025 | गुरुवार 
दसऱ्यामुळं ट्रॅ्क्टर धुवायला गेले, गंगापूरमधील तलावात 4 मुले बुडाली; गावावर शोककळा
दसऱ्यामुळं ट्रॅ्क्टर धुवायला गेले, गंगापूरमधील तलावात 4 मुले बुडाली; गावावर शोककळा
Late Motherhood Challenges: कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
Dasara Melava: बीडमधील कुठल्या दसरा मेळाव्याला किती गर्दी? पाटील-मुंडेंनी मैदान गाजवलं, पाहा फोटो
बीडमधील कुठल्या दसरा मेळाव्याला किती गर्दी? पाटील-मुंडेंनी मैदान गाजवलं, पाहा फोटो
Embed widget