एक्स्प्लोर

Gold Price: पैसे तयार ठेवा, सोन्याचा भाव कोसळायला सुरुवात; तीन दिवसांत 4000 रुपयांची घसरण, चांदीचा भाव 11 हजारांनी खाली पडला

Gold price fall down: राज्याची सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे भाव घसरले. सोन्याच्या भावात तब्बल तीन दिवसात तीन हजार रुपयाची घसरण तर चांदीच्या भावात 11 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Price & Sliver Rates: गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोने (Gold Price) व चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात 4000 हजाराने तर चांदीच्या भावात 11000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने व चांदी (Silver Price) खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी  ग्राहक सोने खरेदी बाबत वेट  अँड वॉच भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय धोरणांमुळे सोने व चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं सोने व्यापारी यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा परिणाम म्हणून जळगावच्या बाजारात सोनं हे घसरले असल्याचे मानले जात आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह 91 हजार 260 तर चांदीचा भाव हा 92 हजार 700 असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात सोने व चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा  मिळाला आहे. परंतु, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा 55 हजारापर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.  त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे भाव सातत्याने खाली येत आहेत. सोन्याचा प्रतितोळा दर काही दिवसांपूर्वी 96 हजारांवर पोहोचला होता. तेव्हापासूनच तज्ज्ञांनी आगामी काळात सोन्याच्या घरात खूप मोठी घसरण होईल, असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले असले तरी एरवी झटक्यात वाढणारे सोन्याचे भाव उलट कमी होत आहेत. जगभरातील गुंतवणुकदार सोन्याकडे पारंपरिक आणि सर्वात सेफ गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील सोन्याचा भाव पाहता, गुंतवणुकदारांना सोन्यातील गुंतवणूक सध्याच्या घडीला जोखमीची वाटत असल्याचे दिसत आहे.

सोन्याच्या दरात का घसरण होतेय?

अमेरिकेतली मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या भावात 38 टक्क्यांची घसरण होऊ शकते. सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्‍या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचं उत्पादन वाढवलं आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे.

2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले. मात्र, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, 71% सेंट्रल बँकर्स पुढील वर्षी सोने खरेदी कमी करू शकतात. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती, त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्र्ल बँकांनी सोन्याचा साठा कमी करणे किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटून भाव घसरण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

आनंदाची बातमी! सोन्याचा भाव 55 हजारांपर्यंत खाली येणार?

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget