Meesho Grocery Business : Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद; 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले
Meesho Grocery Business : ऑनलाईन विक्री करणारी कंपनी Meesho ने भारतातील आपला किराणा व्यवसाय बंद केला आहे.
Meesho Grocery Business : ऑनलाईन बिझनेस कंपनी मीशोने (Meesho) भारतातील किराणा व्यवसाय बंद (Grocery Business Shuts Down) केला आहे. त्यामुळे सुमारे 300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना नेमकं का काढण्यात आलं याबाबत कंपनीने अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या, मीशोचे कर्नाटकसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुपर स्टोअर्स आहेत.
90% सुपर स्टोअर्स बंद (90% Super Stores Clossed) :
सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने भारतातील 90 टक्क्यांहून अधिक शहरांमध्ये सुपर स्टोअर्सचा (Super Store) व्यवसाय बंद केला आहे. सध्या ही दुकाने केवळ नागपूर आणि म्हैसूरमध्ये सुरू आहेत. यामुळे कंपनीने विविध शहरांतील सुमारे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, मीशो कंपनीने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ग्राहकांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी मीशोने किराणा व्यवसाय फार्मिसोला (Farmiso) सुपर स्टोअरमध्ये पुनर्ब्रँड केले होते. कंपनीने यापूर्वी फार्मिसोशी संबंधित 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. कारण त्यावेळी कंपनीला किराणा व्यवसाय वाढवायचा असल्याचे सांगण्यात आले होते.
कोरोना काळातही 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते
यापूर्वी, सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेतही 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यामागे भांडवलाची कमतरता हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. मीशोने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सुपर स्टोअर्स सुरू केले होते. दोन महिन्यांचा पगार देऊन मीशोने लोकांना नोकरीवरून काढून टाकल्याचेही अहवालात म्हटले आहे.
मीशोची ही दुकाने सध्या नागपूर आणि म्हैसूरमध्ये सुरू आहेत. 2022 च्या अखेरीस 12 राज्यांमध्ये सुपरस्टोअर्स उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट होते. मात्र, कंपनीची ही योजना कोलमडताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :