दिलासादायक! सोनं चांदी खरेदी करण्याची मोठी संधी, दरात झाली घसरण, कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीची (Gold and Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहयला मिळाले.
MCX Gold Silver Rate: सोन्या चांदीची (Gold and Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहयला मिळाले. MCX वर आज चांदी तब्बल 2200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोनं 600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळं आज सोने चांदी खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
प्रतिकिलो चांदीचा दर हा 91 हजार रुपयांच्या खाली
सोन्यापेक्षा चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज चांदीच्या दरात तब्बल 2200 रुपयांची घसरण दिसून येत आहे. आज प्रतिकिलो चांदीचा दर हा 91 हजार रुपयांच्या खाली आला आहे. चांदी व्यतिरिक्त, वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोनं 600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72,400 रुपयांच्या जवळ आहे. कालच्या तुलनेत आज वायदे बाजारात चांदीचा भाव 2,274 रुपयांनी घसरला आहे. सध्या चांदीचा दर हा 90,739 रुपये प्रति किलोवर आला आहे. बुधवारी बाजारात चांदीचा दर हा 93,013 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
सोन्याच्या दरातही घसरण
एमसीएक्सवर सोन्याच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत 636 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याचा दर हा 72,410 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 73046 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे
दिल्ली - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
मुंबई - 24 कॅरेट सोने 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,000 रुपये प्रति किलो
पुणे - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
जयपूर - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
लखनौ - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
महत्वाच्या बातम्या: