मार्क झुकरबर्गने केला विक्रम, एका दिवसात तब्बल एवढ्या लाख कोटींची कमाई, जागतीक श्रीमंतांच्या यादीत कितवं स्थान?
फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) पुन्हा एक विक्रम केला आहे. झुकरबर्गने एका दिवसात तब्बल 28 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 2.33 लाख कोटींची कमाई केलीय.
![मार्क झुकरबर्गने केला विक्रम, एका दिवसात तब्बल एवढ्या लाख कोटींची कमाई, जागतीक श्रीमंतांच्या यादीत कितवं स्थान? Mark Zuckerberg set a record earning $28 billion in one day marathi news मार्क झुकरबर्गने केला विक्रम, एका दिवसात तब्बल एवढ्या लाख कोटींची कमाई, जागतीक श्रीमंतांच्या यादीत कितवं स्थान?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/8ba813193178c433117bc11ca54e08611707031080696339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mark Zuckerberg : फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) पुन्हा एक विक्रम केला आहे. झुकरबर्गने एका दिवसात तब्बल 28 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 2.33 लाख कोटींची कमाई केलीय. यामुळं जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत मार्क झुकरबर्गने चौथा क्रमांक मिळवलाय. झुकरबर्गबरोबर गौतम अदानीच्या क्रमवारीतही सुधारणा झालीय.
मार्क झुकरबर्गने एका दिवसात 28 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केलीय.झुकरबर्गने एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. विशेष म्हणजे या वाढीमुळं त्याने बड्या दिग्गजांना मागे टाकलेंय. त्याने जगातील टॉप 5 अब्जाधीशांमध्ये आपले स्थान निर्माण केलंय. मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत अशीच वाढ दिसली तर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून तो जगातील तिसरा श्रीमंत अब्जाधीश होऊ शकतो. दरम्यान, चालू वर्षत मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्ती देखील वाढ झाली आहे. अदानी यांनी एका स्थानाची सुधारणा केली आहे. ते जगातील 13 व्य क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती किती?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.मेटा शेअर्समध्ये शुक्रवारी 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळं मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 28.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती 170 अब्ज डॉलर झाली आहे. विशेष म्हणजे त्याने स्टीव्ह बाल्मर आणि बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. त्यानंतर तो जगातील चौथा सर्वात श्रीमंत अब्जाधीश बनला आहे. चालू वर्षात झुकेरबर्गच्या संपत्तीत 42.4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
गौतम अदानी यांना मोठा फायदा
गौतम अदानी यांच्या संपत्तीत 600 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 5000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 97.4 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र, यावर्षी त्यांची एकूण संपत्ती 13.2 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याचबरोबर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.25 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळं त्यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र, चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत 12.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी 11 व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, 12 अब्जाधीशांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.
महत्वाच्या बातम्या:
19 वर्षी फेसबुकची स्थापना, 23 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश; मार्क झुकरबर्ग यांची यशोगाथा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)