भारतासह जगभरात UPI ची लोकप्रियता वाढली, जगातील 'या'देशांमध्ये UPI वापरण्याची परवानगी
Make In India : UPI आता भारतासह (India) जगातील अनेक देशात लोकप्रिय ठरत आहे. फ्रान्समध्येही (France) UPI वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Make In India : UPI आता भारतासह (India) जगातील अनेक देशात लोकप्रिय ठरत आहे. फ्रान्समध्येही (France) UPI वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पॅरिसमधील (Paris) आयफेल टॉवर हे पहिले ठिकाण आहे जिथे UPI वापरण्यात आले. UPI ने भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी क्रांतिकारी भूमिका बजावली आहे. UPI च्या जलद, झटपट आणि सुरक्षित सेवेमुळं याविषयी लोकांमध्ये लोकप्रियता वाढत आहे.
UPI वापरण्यास फ्रान्समध्ये मान्यता मिळाली
सध्या UPI ला फ्रान्समध्ये मान्यता मिळाली आहे. त्यामुळं तुम्हाला आता आयफेल टॉवर पाहण्यासाठी UPI वरुन तिकीट खरेदी करता येणार आहे. आयफेल टॉवर हे फ्रान्समधील पहिले ठिकाण आहे जिथे UPI चा वापर सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, UPI केवळ फ्रान्समध्येच नाही तर 11 देशांमध्ये वापरला जात आहे.
या देशातही UPI वापरण्यास मान्यता
अनेक देशांमध्ये UPI वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. फ्रान्स व्यतिरिक्त, यूएई, भूतान, सिंगापूर, नेपाळ, यूके, फ्रान्स, ओमान, जपान, मलेशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमध्येही याला मान्यता मिळाली आहे. भविष्यात तुम्हाला आणखी अनेक देशांमध्ये UPI द्वारे यशस्वी पेमेंट होण्याची शक्यता आहे. आयफेल टॉवरला फ्रान्समध्ये प्रथम स्थान म्हणून निवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे आयफेल टॉवरला भेट देण्याच्या बाबतीत भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
UPI म्हणजे नेमकं काय?
UPI हे रिअल टाइम मनी ट्रान्सफर प्लॅटफॉर्म आहे. ते थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे. तुम्ही UPI ला कोणत्याही पेमेंट ॲपशी कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर जो काही व्यवहार होईल तो थेट तुमच्या बँक खात्यातून होईल. सरकारने तयार केलेल्या भीम ॲपद्वारे तुम्ही UPI देखील वापरू शकता. जानेवारी 2024 मध्ये 1220 कोटी रुपयांचे UPI व्यवहार झाले आहेत.
एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार
ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारनं नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. आता एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी 5 लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.
महत्वाच्या बातम्या: