अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल, आता आयकर भरणारे या योजनेत सहभागी होऊ शकणार नाही
Atal Pension Yojana : जर तुम्ही आयकर भरत असाल आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Atal Pension Yojana : जर तुम्ही आयकर भरत असाल आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की 1 ऑक्टोबरपासून जे लोक आयकर भरतात ते या योजनेत सामील होऊ शकणार नाही. काय आहेत याची कारण? आणि या योजनेचा किती जण लाभ घेत आहेत. हेच आपण जाणून घेणार आहोत.
मोदी सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली आणि आत्तापर्यंत सर्वात यशस्वी ठरलेली अशी योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आणलेल्या योजनेतून अनेक जणांनी फायदा घेतला आहे. एकूणच कमी प्रिमियम आणि फायदे अधिक अशी ही सरकारी धोरणांशी जवळीक असलेली योजना अधिक यशस्वी ठरली. मात्र ज्यांची करपात्र उत्पन्नापेक्षा अधिक मिळकत आहे, अशांना येत्या 1 ऑक्टोबरपासून ह्या योजनेत सहभागी होता येणार नाही आहे.
या योजनेचा मुख्य हेतू असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा हेतू होता. मात्र, अनेक कॉर्पोरेटकंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी देखील याचा लाभ घेतला. अशात ह्या योजनेची लोकप्रियता वाढत गेली आणि मार्च 2022 पर्यंत ही संख्या 4 कोटींच्या घरात गेली आहे.
काय आहे अटल पेन्शन योजना?
- अटल पेन्शन योजना 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली.
- योजनेत सहभागी सदस्याला वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दर महिना पेन्शनचा लाभ मिळतो.
- दर महिना पेन्शनचा लाभ दरमहा 1 हजार ते 5 हजार.
- रुपयांपर्यंत निवृत्ती वेतनाची हमी.
- मुख्य म्हणजे ही हमी सरकार घेते आहे आणि पीएफआरडीए अंतर्गत येणारी प्रमुख योजना
- 18-40 वर्षे वयोगटातील सर्व नागरिक बँक किंवा पोस्टाच्या शाखांच्या माध्यमातून योजनेत सामील होऊ शकतात.
दरम्यन, अटक पेन्शन योजनेची लोकप्रियता वाढत होती. सरकारचा उद्देश प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना ह्या योजनेचाअधिक फायदा मिळावा असा होता. मात्र, यात करदाते देखील दाखल होत असल्यानं केंद्र सरकारकडून योजनेतील नियमांतच बदल केले गेले. ज्यामुळे सरकारच्या खिशावरील बोजा देखील कमी होताना दिसेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Syrma IPO : पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, आजपासून सिरमा टेक्नॉलॉजीचा IPO बाजारात, वाचा सविस्तर
Top Gainer August 11, 2022 : शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत आहेत?