एक्स्प्लोर

Loan Settlement : तुम्हीही कर्ज घेतलंय? मग 'ही' चूक करु नका, नाहीतर आयुष्यभर परिणाम भोगावा लागेल...

Loan Settlement Impact : बरेच लोक कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी लोन सेटलमेंटचा पर्याय निवडतात, पण याचा वाईट परिणाम होतो. कसा तो जाणून घ्या...

Impact of Loan Settlement : अडचणीत असताना किंवा काही महत्त्वाच्या कामांसाठी अनेक जण कर्ज (Loan) घेतात. अशा कठीण काळात हा एकच सोप पर्याय असतो. त्याशिवाय नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठीही अनेक जण कर्ज घेतात. मात्र, काही वेळी घेतलेलं कर्ज चुकवण्यात अडथळे येतात. नोकरी गमावणे, व्यवसायात नुकसान किंवा आजारपणासारख्या परिस्थितीमुळे कर्जाचे हप्ते फेडण्यात अडचणी येतात. कर्जाचे हप्ते चुकविल्यामुळे कर्जदारावरील व्याज आणि दंड वाढतो. अशा परिस्थितीत लोक कर्ज सेटल (Loan Settlement) करण्याचा पर्याय निवडतात. यामुळे काही समस्या तात्पुरती सुटतं असली तरी नंतर त्याचे वाईट परिणाम समोर येतात.

अर्थ मंत्रालयाचे निर्देश

अलिकेड अर्थ मंत्रालयाने खाजगी बँकांना 20 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज थकबाकीदारांकडून परस्पर संमतीने वन टाईम सेटलमेंट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे छोट्या-छोट्या अडकलेल्या कर्जांतून सुटका करता येईल. अनेक वेळी बँका कर्जदाराला त्यांच्या वतीने लोन सेटलमेंट करण्याचा पर्याय देते. तसेच, अनेक प्रकरणांमध्ये, कर्जदार स्वतः सेटलमेंटसाठी बँकेत जाऊन सेटलमेंटद्वारे दिलासा देण्याची मागणी करतात. दोन्ही प्रकरणांमध्ये तात्पुरती सुटका होत असली तरी, शेवटी कर्जदारालाच याचा तोटा सहन करावा लागतो.

कोणत्या परिस्थितीत बँका ऑफर देतात?

जेव्हा एखादी व्यक्ती 90 दिवसांपेक्षा जास्त म्हणजे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ कर्जाचे हप्ते (EMI) भरत नाही, तेव्हा बँका किंवा संबंधित वित्त संस्था कर्जदाराला EMI न भरण्याचं कारण विचारतात. बँका किंवा वित्त कंपन्या त्या व्यक्तीच्या दाव्याची बारकाईने तपासणी करतात. जर त्यांना वाटत असेल की, कर्जदाराकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता नाही, तर कर्जदाराला लोन सेटलमेंट ऑफर केली जाते.

लोन सेटलमेंट कशी होते?

वन टाईम लोन सेटलमेंटमध्ये, बँक किमान मूळ रक्कम एकाच पेमेंटमध्ये जमा करून लोन सेटल करण्याचा प्रयत्न करते. या परिस्थितीत बँका कर्जदाराला व्याज, दंड किंवा कायदेशीर खर्च माफ करतात. कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता आणि परिस्थिती लक्षात घेऊन सेटलमेंट रक्कम ठरवली जाते. सेटलमेंट रक्कम भरल्यानंतर, बँक एकूण थकबाकी रक्कम आणि सेटलमेंट रक्कम यांच्यातील फरक लिहून कर्जाचं खातं बंद (Loan Settle) करते.

क्रेडिट स्कोर खराब होईल

लोन सेटलमेंटमुळे तात्काळ आराम मिळतो, पण त्यानंतर याचे वाईट परिणाम समोर येतात. लोन सेटलमेंट केल्यावर, कर्ज खात्याची स्थिती 'बंद' ऐवजी 'सेटल' दर्शवते. कर्ज वेळेवर भरून कर्ज बंद केल्यावर कर्ज खात्याची स्थिती 'बंद' म्हणून दर्शविली जाते. वित्तीय संस्थांकडून ही माहिती क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे जाते. सेटल खाते हे सामान्यपणे बंद केलेलं खातं नसतं, म्हणून ते निगेटिव्ह रेटिंग मानलं जातं. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो आणि पुढील अनेक वर्षे तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

लोन सेटल करण्याआधी 'हे' पर्याय वापरून पाहा

कर्झ भरण्यात अडचणी येत असल्यास लोन सेटलमेंट हा शेवटचा पर्याय असावा. याशिवाय इतर काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता. तुमच्याकडे काही बचत किंवा गुंतवणूक असल्यास, संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याचा वापर करा. नातेवाईक किंवा मित्रांकडून व्याजमुक्त कर्ज घेऊन बँकेची थकबाकी भरण्याचा प्रयत्न करा. लोन सेटलमेंट करण्याऐवजी कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडे आणखी काही कालावधी मागा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget