एक्स्प्लोर

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावलं पहिलं स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केलीय.

World Most Popular Leader 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगातील सर्व आघाडीच्या नेत्यांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते लोकप्रियतेच्या बाबतीत जागतिक नेत्यांमध्ये अव्वल स्थानावर होते.

दरम्यान, वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर लीडर 2024 ही यादी समोर आल्यानंतर पाश्चिमात्य देशांचे नेतेही सध्याच्या जागतिक परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेशी काहीही संबंध नसल्याचे मान्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक मंचावर एक मजबूत आणि यशस्वी नेते म्हणून उदयास आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आजही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही.

कोणत्या नेत्याला किती टक्के लोकप्रियता?

सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या या यादीमध्ये जगातील सर्व लोकप्रिय नेत्यांची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्वेक्षणात 77 टक्के लोकप्रियतेसह अव्वल दाखवण्यात आले आहे. त्याच वेळी, मेक्सिकन पंतप्रधान आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांची लोकप्रियता 64 टक्के आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल होम अफेयर्स विभागाचे प्रमुख अलेन बर्सेट यांना 57 टक्के, तर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांना 50 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर ब्राझीलचे पंतप्रधान लुईझ इंसिओ लुला दा सिल्वा यांना 47 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 45 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जागतिक स्तरावर 44 टक्के लोकप्रियता मिळवली आहे. यानंतर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना या यादीत 38 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना 37 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. 

दरम्यान, या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लोकप्रियतेचा आकडा 35 टक्के आहे. तर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन हे 33 टक्के, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 27 टक्के, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना 24 टक्के आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांना 20 टक्के लोकप्रिय मानले जाते. एकूणच या आकडेवारीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जगातील कोणत्याही देशाचे नेते त्यांच्या आजूबाजूला दिसत नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

PM Modi : 'सर्व मंत्र्यांनी पुढील 100 दिवसांचा 'Action Plan'पाठवा!' पंतप्रधान मोदींच्या स्पष्ट सूचना, बैठकीत काय म्हणाले मोदी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget