Life Certificate Submission Deadline : लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 30 नोव्हेंबरपर्यंत 'हे' काम पूर्ण करा; अन्यथा पेन्शन होईल बंद
Life Certificate Submission Deadline : ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळते.
Life Certificate Submission Deadline : जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. पेन्शन (Pension) घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात सर्व पेन्शनधारकांना त्यांच्या हयातीचा पुरावा द्यावा लागतो. नियमांनुसार, ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळते. त्याच वेळी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी हे काम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान पूर्ण करणे आवश्यक आहे. जर नागरिकांनी हे काम पूर्ण केलं नाही तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते.
जीवन प्रमाणपत्र अनेक प्रकारे सादर केले जाऊ शकते
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर पेन्शन धारकांनी अजून जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर ते लवकरात लवकर करा. अन्यथा तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांचा वापर करू शकता. ऑफलाईन, तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक सारख्या पेन्शन जारी करणार्या संस्थेकडे जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. याशिवाय डोअर स्टेप बँकिंग, डिपार्टमेंट ऑफ पेन्शनर्स वेलफेअर (DoPPW) फेस ऑथेंटिकेशन, उमंग अॅप, पोस्टमन ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आणि जीवन प्रमाण पोर्टलद्वारे तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सहजपणे कोणत्याही अडचणीशिवाय सादर करू शकता.
जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?
केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे की नाही हे या प्रमाणपत्रावरून कळते. जर तुम्ही हे प्रमाणपत्र सादर केलं नाही तर पेन्शन जारी करणारी संस्था अशा पेन्शनधारकांची पेन्शन थांबवते.
पेन्शन बंद झाल्यावर काय होईल?
नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने नोव्हेंबरमध्ये आपले जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्या व्यक्तीला डिसेंबर 2023 पासून पेन्शन मिळणे बंद होईल. त्यानंतर जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पेन्शन मिळेल. तुम्ही डिसेंबरऐवजी जानेवारीमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केल्यास तुम्हाला जुन्या महिन्याची पेन्शनची थकबाकी मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमची पेन्शन मिळणे सुरू ठेवायचे असेल, तर नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :