(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलासादायक! LIC ने कमावला 9444 कोटी रुपयांचा नफा, 4 रुपयांचा लाभांश जाहीर; गुंतवणूकदारांना चांगले दिवस
LIC Share Price: भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजेच LIC साठी आनंदाची बातमी आहे. LIC ने तिसऱ्या तिमाहीत 9444 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
LIC Share Price: भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजेच LIC साठी आनंदाची बातमी आहे. LIC ने तिसऱ्या तिमाहीत 9444 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. यानंतर कंपनीने प्रति शेअर 4 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. यामुळं मध्ये LIC गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या स्टॉकने गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे, कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, ज्यात नफ्यात जोरदार उडी मारली आहे. एलआयसीने ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 9,444 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6334 कोटी रुपये होता. एलआयसीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 4 रुपये लाभांशही जाहीर केला आहे.
लाभांश पुढील 30 दिवसांत भागधारकांना दिला जाणार
तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना, LIC ने सांगितले की, या कालावधीत त्यांना एकूण 1.17 लाख कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 5 टक्के अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1.11 लाख कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला होता. एलआयसीचा नफा 49 टक्क्यांनी वाढून 9,444 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या बोर्डाने भागधारकांना प्रति शेअर 4 रुपये लाभांशही जाहीर केला आहे. हा लाभांश पुढील 30 दिवसांत भागधारकांना दिला जाईल.
एलआयसीच्या स्टॉकने गाठला 1145 रुपयांचा उच्चांक
जीवन विमा व्यवसायात 58.90 टक्के वाटा असलेली LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. डिसेंबर 2023 पर्यंत, एलआयसीची एयूएम 49.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जे गतवर्षी याच कालावधीपर्यंत 44.34 लाख कोटी रुपये होते. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमुळं एलआयसीही चर्चेत आहे. गुरुवारी एलआयसीच्या स्टॉकने 1145 रुपयांचा उच्चांक गाठला होता. बाजार बंद होण्याच्या वेळी, शेअर 1105.25 रुपयांवर बंद झाला. LIC चे मार्केट कॅप 6.99 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसी बाजार मूल्याच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकाची सूचीबद्ध कंपनी बनली आहे आणि इन्फोसिसपासून काही पावले दूर आहे. एलआयसीचा स्टॉक गेल्या तीन महिन्यांत 80 टक्के आणि एका महिन्यात 34 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या एलआयसीचा नफा 49 टक्क्यांनी वाढून 9,444 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या बोर्डाने भागधारकांना प्रति शेअर 4 रुपये लाभांशही जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या: