(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी 'स्वतंत्र बँक अकाऊंटची' अट का? जाणून घ्या सविस्तर माहिती
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची (separate bank account) अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? याबाबतची माहिती पाहुयात.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची (separate bank account) अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी राबवली जाणार आहे. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली असे तटकरे म्हणाल्या.
सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या चार दिवसांनी म्हणजेच (17 ऑगस्टला) या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. रक्षाबंधणपूर्वी सरकारकडून महिलांना ही भेट मिळणार आहे.
शनिवारी 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन
येत्या शनिवारी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये येत्या शनिवारी 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पैसे वितरित करण्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची आज 11 वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची अतिशय महत्त्वाची समजणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण होईल. या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला वितरित करणार आहे . त्यासाठी राज्य सरकार मोठा कार्यक्रम आयोजित करत आहे तो कार्यक्रम संदर्भात आज निर्णय होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी वितरीत केला जाणार आहे. त्यापूर्वी शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचं महायुतीचं सरकार मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये शनिवारी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती राहणार आहेत. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पालकमंत्रीही सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
राज्यातील किती महिलांना मिळणार 'लाडकी बहिण योजनेचा' लाभ? सविस्तर माहिती एका क्लिकवर