एक्स्प्लोर

Jio BlackRock : जिओ ब्लॅकरॉक चार नवे इंडेक्स फंड आणणार, सेबीची मंजुरी, 500 रुपयांपासून गुंतवणुकीची संधी

Jio BlackRock : जिओ ब्लॅकरॉक यांच्याकडून सेबीनं मंजुरी दिल्यानंतर चार इंडेक्स फंड आणले जाणार आहेत. 500 रुपयांपासून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे.

मुंबई : जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडला सेबीनं चार नव्या पॅसिव्ह गुंतवणूक योजना सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीनं बुधवारी सेबीच्या वेबसाईटवर जारी केलेल्या रेग्युलटरी फायलिंगसंदर्भात माहिती दिली. जिओ ब्लॅकरॉक निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंडचा समावेश आहे. या योजनेनुसार ओपन-एंडेड फंड निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करण्यासह मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल. मिडकॅप सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीचा पर्याय मिळेल.

जिओ ब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंडचा फोकस निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्सवर केंद्रीत असेल. यामध्ये मार्केट कॅपच्या आधारे 51 ते 100 रँक दरम्यानच्या कंपन्यांचा समावेश असेल. हा गुंतवणूकदारांना भविष्यात लार्ज कॅपमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते.

जिओ ब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड देखील आणला जाणार आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड निफ्टी स्मॉल कॅप 250 निर्देशांकाचा भाग असेल. ही योजना लाँग टर्म कॅपिटल ग्रोथची इच्छा असणाऱ्या आणि हाय रिस्क घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.

जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 8 ते 13 वर्ष जी-सेक इंडेक्स फंड ही चौथी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन सरकारी गिल्ट्सला ट्रॅक करेल. याचा मॅच्युरिटीचा कालावधी 8 ते 13 वर्ष आहे. ही योजना निश्चित उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी असेल.

ब्लॅकरॉकनं या योजनांना इंडेक्स फंडच्या रुपात डिझाइन केलं आहे. हे फंड केवळ डायरेक्ट प्लॅन आणि ग्रोथ ऑप्शन या पर्यायात असेल. या योजनांमध्ये कोणताही एक्झिट लोड नसेल. गुंतवणुकीची किमान रक्कम 500 रुपये आहे. या सर्व योजनांद्वारे सेबीच्या निर्देशांचं पालन केलं जाणार आहे. प्रत्येक फंडची ऑफर एनएफओद्वारे सुरु होईल. ही ऑफर 3 ते 15 दिवस सुरु असेल. अद्याप याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनीनं 50 टक्के समान भागीदारीत जिओ ब्लॅकरॉक या कंपनीची सुरुवात केली आहे. ही भागीदारी जुलै 2023 मध्ये झाली होती. मे 2025 पर्यंत म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्याची परवानगी यांना मिळाली होती. त्यानंतर जिओ ब्लॅकरॉकला गुंतवणूक सल्लागार आणि ब्रोकरेज फर्म म्हणून काम करण्यास परवानगी मिळाली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget