Jio BlackRock Approval: मुकेश अंबानींच्या कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसायाला सेबीची मंजुरी, शेअर खरेदीसाठी लागली रांग
Jio BlackRock Approval: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांचा संयुक्त उद्योग जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला सेबीकडून दिलासा मिळाला आहे.

Jio BlackRock Approval मुंबई : मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक यांच्या संयुक्त उद्योग जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला सेबीकडून गुड न्यूज मिळाली आहे. जिओ ब्लॅकरॉकला भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यास सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळं आता कंपनी भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायात पाऊल ठेवता येईळ. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरची खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये तीन टक्के तेजी आली आहे.
जिओ ब्लॅकरॉकच्या कंपनीचे प्रमुख संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सिड स्वामीनाथन यांना नियुक्त केलं आहे. ब्लॅकरॉकमध्ये इंटरनॅशनल इंडेक्स इक्विटीचे ते प्रमुख राहिले आहेत. स्वामीनाथान यांनी 1.25 ट्रिलियन डॉलर्सच्या असेटचं व्यवस्थापन केलं आहे.
ईशा अंबानी काय म्हणाल्या?
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या गैर कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी म्हटलं की ब्लॅकरॉक यांच्याके जागतिक गुंतवणुकीचं प्राविण्य आहे. जिओकडे डिजिटल फर्स्ट इनोवेशन आहे. ब्लॅकरॉकसह आमची भागीदारी महत्त्वाची आहे. आम्ही सोबत प्रत्येक भारतीयासाठी गुंतवणूक सरळ, सोपी आणि सर्वसमावेशक कऱण्यासाठी कटिद्ध आहे. जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट भारतात वित्तीय सशक्तीकरणाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही त्या म्हणाल्या.
ब्लॅकरॉकमध्ये इंटरनॅशनल हेड असलेल्या रेचल लॉर्ड यांनी म्हटलं की जिओ ब्लॅकरॉक थेट गुंतवणूकदारांना कमी खर्चावर संस्थात्मक गुणवत्ता असलेली उत्पादनं आणि सेवा देईल. भारतात अधिक लोकांना भांडवली बाजारापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. आज शेअरमध्ये 10 रुपयांची वाढ झाली. शेअर 291 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये आझ 3.55 टक्क्यांची वाढ झाली आहे. जिओ फायनान्शिअलचा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 368.75 रुपये इतका आहे तर नीचांक 198 रुपये इतकी आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























