एक्स्प्लोर

जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन; कर्करोगानं त्रस्त होत्या अनिता गोयल

Naresh Goyal Wife Anita Goyal Passed Away: नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Anita Goyal Passes Away) यांचं निधनगुरुवारी पहाटे 3 वाजता मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Jet Airways Founder Naresh Goyal Wife Anita Goyal Passed Away: मुंबई : जेट एयरवेज (Jet Airways) चे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Anita Goyal Passes Away) यांचं निधन झालंय. दीर्घकाळापासून त्या कर्करोगानं ग्रस्त होत्या. गुरुवारी पहाटे 3 वाजता अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या नरेश गोयल यांना नुकताच पत्नीला भेटण्यासाठी सशर्त जामीन देण्यात आला होता. आपली पत्नी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असून आपल्याला तिच्यासोबत राहायचंय, अशी विनंती त्यांनी न्यायालयासमोर केली होती. नरेश गोयल स्वतःही कॅन्सरनं ग्रस्त आहेत. 

नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झालंय. त्यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. गोयल कुटुंबात अनिता गोयल यांच्या पश्चात त्यांचे पती आणि दोन मुलं नम्रता आणि निवान गोयल आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी आपल्या पत्नीसोबत राहण्यासाठी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अंतरिम जामीन (Interim Bail) मागितला होता आणि त्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. 

मी तुरुंगातच मरण पावलो तर बरं होईल; भर कोर्टरुममध्ये नरेश गोयल यांनी न्यायाधीशांना हात जोडले 

जेट एअरवेजच्या दिवाळखोरीनंतर नरेश गोयल अडचणीत आले आहेत. कॅनरा बँकेच्या फसवणुकीच्या आरोपावरून नरेश गोयल या वर्षी 6 जानेवारीला मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी न्यायाधीशांसमोर हात जोडले आणि मी तुरुंगातच मरण पावलो तर बरं होईल, असं सांगितलं. गोयल कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, "अनिता गोयल यांचं पहाटे 3 वाजता निधन झालं. त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. नरेश गोयल सध्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आहेत." 

दरम्यान, एकेकाळी जेट एअरवेज ही भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्यांपैकी एक होती. परंतु, कमकुवत आर्थिक परिस्थिती आणि कर्जामुळे जेट एअरवेजनं 17 एप्रिल 2019 रोजी आपली विमानसेवा थांबवली. 30 वर्षांपूर्वी जेट एअरवेजकडे 120 विमानं होती, मात्र ज्यावेळी एअरलाईननं आपली सेवा थांबवली त्यावेळी केवळ 16 विमानं उरली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :                          

Mumbai TDR Rates: मुंबई घर घ्यायचं स्वप्न स्वप्नचं राहणार? TDR मध्ये दुपटीनं वाढ, घरांच्या किमती 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget