आता विमा पॉलिसीवर एजंटचे कमिशन सांगणे होणार बंधनकारक, येत आहे नवीन नियम
Insurance Policy Rule : आत्तापर्यंत तुम्ही ज्याही विमा पॉलिसी घेतल्या आहेत, त्याच्या दस्तऐवजावर एजंटचे कमिशन कळत नव्हते किंवा तसे सांगितले जात नव्हते.
Insurance Policy Rule : आत्तापर्यंत तुम्ही ज्याही विमा पॉलिसी घेतल्या आहेत, त्याच्या दस्तऐवजावर एजंटचे कमिशन कळत नव्हते किंवा तसे सांगितले जात नव्हते. मात्र आता विमा पॉलिसी घेतल्यावर कंपनीला ग्राहकांना एजंटच्या कमिशनची माहिती देणे बंधनकारक होणार आहे. या संदर्भातील नियम लवकरच लागू होणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून असा नियम लागू करण्यासाठी औपचारिक मान्यता प्राप्त झाली आहे. पॉलिसी खरेदी केल्यानंतर प्राप्त होणार्या पावती आणि कागदपत्रांवरच एजंटच्या कमिशनची माहिती दिली जाईल. सध्या कोणत्याही प्रकारची पॉलिसी घेतल्यावर एजंटकडून मिळणाऱ्या कमिशनबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. हा नियम देशातील सर्व प्रकारच्या विम्यांना लागू असेल. IRDAI ला विमा क्षेत्रात पूर्ण पारदर्शकता आणायची आहे, यासाठीच हा नवीन नियम आणला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
हा नियम एग्रीगेटरला लागू असेल
अनेक वेळा विमा कंपन्या एजंटला आयआरडीएआयने ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा कितीतरी पट अधिक कमिशन देतात. परंतु आता विमा कंपन्या हे करू शकणार नाहीत. याचा फायदा ग्राहकांना होणार असून विमा घेताना ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागणार. ऑनलाइन विम्यासाठी एग्रीगेटरवर हा नियम लागू होईल. एग्रीगेटरला दिलेल्या कमिशनची संपूर्ण माहिती ग्राहकांना दिली जाईल.
विम्याचा प्रीमियम वेग-वेगळा का असतो?
ऑनलाइन किंवा एजंटकडून विमा खरेदी करताना ग्राहकाला तेवढीच रक्कम भरावी लागते, असे विमा तज्ज्ञांचे मत आहे. सध्या फक्त एक प्रकारचा आरोग्य विमा किंवा मोटर विमा आहे, ज्यावर सर्व कंपन्यांचे प्रीमियम वेगवेगळे आहेत. याचे कारण म्हणजे विमा विकणाऱ्या एजंटचे कमिशन असल्याचे सांगण्यात येत आहे. IRDAI च्या या निर्णयामुळे विमा कंपन्या प्रचंड नाराज आहेत. हा नियम जुलैमध्ये कधीही लागू होऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
Share Market : शेअर बाजार वधारला, Sensex 616 अंकांनी वधारला तर Nifty 15,750 वर
RBI : बँक अकाऊंट इन-ऑपरेटिव्ह झालंय? 'असे' करा सक्रिय, RBI ची माहिती