(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोडले सारे विक्रम! Tata Tech ची धमाकेदार लिस्टिंग; IPO घेणाऱ्या गुंतवणूकदारांची पहिल्याच दिवशी चांदी
Tata Technology IPO Listing: टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सनी शेअर बाजारात थाटात पदार्पण केलं असून त्यात 140 टक्के वाढ झाली आहे. या शेअर्सचं बीएसईवर 140 टक्के प्रीमियमवर लिस्टिंग झालं आहे.
Tata Technologies IPO: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाची (TATA Group) कंपनी आज शेअर्सची बाजारात (Share Market) लिस्टिंग झाली आहे. टाटा (TATA) आणि विश्वास हे अतूट समीकरण आहे. हेच टाटांच्या आयपीओबाबतही (TATA Group IPO) खरं ठरल्याचं पाहायला मिळालं. जवळपास दोन दशकांनंतर म्हणजेच, 20 वर्षांनंतर, टाटा समूहानं त्यांच्या कंपनी टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ (Tata Technology IPO) बाजारात आणला आणि गुंतवणूकदारांनी तो लगेचच स्वीकारला. आज शेअर बाजारात टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technology) आयपीओची थाटात एन्ट्री झाली आणि टाटा टेक शेअर्सनी NSE आणि BSE वर बंपर लिस्टिंगसह व्यवहार सुरू केला. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमतीला टाटांच्या शेअर्सची लिस्टिंग झाली आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची लिस्टिंग किती किमतीला झाली?
टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स बीएसईवर 1200 रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. टाटा टेक शेअर्स थेट 140 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाले आहेत. टाटा टेकच्या 500 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ही लिस्टिंग विलक्षण आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 700 रुपयांचा थेट फायदा झाला आहे.
GMP कडूनही बंपर लिस्ट होण्याचे मिळालेले संकेत
आज सकाळी, टाटा टेकच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 85 टक्के होता, म्हणजेच, 475 रुपये नफा दाखवत होता. परंतु, लिस्टिंगनं सर्व अंदाज मोडीत काढत विक्रम रचला आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त किमतीला हे शेअर्स लिस्ट झाले आहेत. पूर्ण 140 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग करण्यात आली आहे आणि गुंतवणूकदारांना 500 रुपयांच्या शेअरवर 700 रुपये नफा मिळाला आहे. 1200 रुपयांच्या धमाकेदार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Watch Live!
— BSE India (@BSEIndia) November 30, 2023
Listing Ceremony of Tata Technologies from 9:15AM onwards today at BSE.https://t.co/lfwu7LeI7y
IPO तपशील
टाटा टेकचा आयपीओ 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता आणि कंपनीनं शेअर्सची किंमत 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती. टाटांच्या कंपनीच्या पदार्पणाच्या शेअर्सचं बाजारानं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. IPO ला तब्बल 65 टक्के सबस्क्रिप्शन मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचं शेअर बाजारात नोव्हेंबर 2021 नंतर सर्वोत्तम लिस्टिंग झाल्यचं बोललं जात आहे.
IPO ला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद
Tata Technologies च्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी खूप रस दाखवला होता आणि कंपनीच्या 4,50,29,207 शेअर्सच्या तुलनेत 3,12,63,97,350 शेअर्ससाठी बोली लागली होती. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांचा हिस्सा 16.50 पट, क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सनी 203.41 पट आणि नॉन-इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सनी 62.11 पटीनं सब्सक्राइब केलं आहे. कंपनीच्या कर्मचार्यांचे शेअर्स 3.70 पट आणि शेअर होल्डर्सचे 29.19 पट सबस्क्राइब झाले आहेत. हा IPO 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीनं त्याची किंमत 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती.