search
×

IPO New Listings: पुढच्या आठवड्यात पाच कंपन्यांच्या शेअर्सचं लिस्टिंग; आयपीओत दमदार कामगिरी, बाजारात होणार का कमाल?

IPO New Listings: मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान तीन IPO देखील खुला होणार आहेत.

FOLLOW US: 
Share:

IPO New Listings: दलाल स्ट्रीटमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खळबळ उडाली आहे. वास्तविक, अनेक कंपन्या त्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) जारी करत आहेत आणि नंतर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होत आहेत. 20 डिसेंबरपासून सुरू होणारा आठवडाही याला अपवाद नाही कारण या काळात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्य मॅपमायइंडिया, श्रीराम प्रॉपर्टीज, मेट्रो ब्रँड्स, मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि डेटा पॅटर्नचा समावेश आहे.

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान तीन IPO देखील खुला होणार आहेत. यामध्ये व्हिवो कोलॅबोरेशन (Vivo Collaboration Solutions), सीएमएस इन्फो सिस्टीम (CMS Info Systems) आणि ब्रँडबकेट मीडिया टेक्नोलॉजी ( Brandbucket Media & Technology ) चे IPO समाविष्ट आहेत.

मॅप माय इंडिया (MapMyIndia)
मॅपमायइंडियाला ऑपरेट करणारी कंपनी सीई इंफो सिस्टीम्सचा आयपीओ 9 डिसेंबर रोजी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ही कपंनी मॅपमायइंडियाला लोकेशन आणि नेव्हिगेशन सेवा संचालित करते. या कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो जवळपास 155च्या पटीने सबस्क्राईब झाला आणि 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

श्रीराम प्रॉपर्टीज (Shriram Properties)
बेंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO 8 डिसेंबरला उघडला आणि 10 डिसेंबरला बंद झाला. तो 4.6 च्या पटीने सबस्क्राईब करण्यात आला. 20 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

मेट्रो ब्रँड (Metro Brands)
पादत्राणे किरकोळ विक्रेते असलेला मेट्रो ब्रँड्सचा IPO 10 ते 14 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हा देखील 3.64 पटीने सबस्क्राईब झाला. कंपनी 22 डिसेंबर शेअर बाजारात लिस्ट होताना आता हा काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मेडप्लस (MedPlus)
भारतातील दुसरी सर्वात मोठी फार्मसी रिटेलर मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत सदस्यत्वासाठी खुला होता. जो 52.6 पटीने सबस्क्राईब करण्यात झाला. आता 23 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

डेटा पॅटर्न (Data Patterns)
डेटा पॅटर्न (इंडिया) लि कपंनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना इलेक्ट्रॉनिक प्रणाली पुरवणारी कंपनी आङे. हा आयपीओ 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शन साठी खुला होता. हा आयपीओ तर 119 च्या पटीने सबस्क्राईब झाला. 24 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Published at : 19 Dec 2021 07:11 PM (IST) Tags: MapmyIndia Shriram Properties Metro Brands Data Patterns CE Info Systems India Data Patterns India IPO New Listings MedPlus Health Services

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!

EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा

EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!