एक्स्प्लोर

LIC IPO: ग्रे बाजारात एलआयसीची जोरदार चर्चा, 10 दिवसात 'इतका' वाढला दर

LIC IPO News: ग्रे बाजारात एलआयसीच्या आयपीओचा बोलबाला असून मागील 10 दिवसात सहापटीने दर वाढला आहे.

LIC IPO News: भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ आजपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा आयपीओ 4 मे ते 9 मे दरम्यान खुला होणार आहे. आयपीओमध्ये कंपनीने प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. ग्रे बाजारात  एलआयसीच्या आयपीओची जोरदार चर्चा आहे. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओ दर 90 रुपये झाला आहे. यानुसार, एलआयसीची शेअर बाजारात 10 टक्के प्रीमियम दराने लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. 

GMP मध्ये सातत्याने वाढ

LIC IPO च्या जीएमपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ग्रे मार्केट प्राइज (GMP) 45 रुपये होती. तर, आज GMP 70 रुपयांपासून सुरू झाला आणि 90 रुपयांवर पोहचला.  23 एप्रिल रोजी GMP 15 रुपये होता. एलआयसी आयपीओची GMP 23 एप्रिलपासून आतापर्यंत 6 पटीने वाढला आहे. 

किती रुपयांना होऊ शकतो लिस्ट?

एलआयसी आयपीओची GMP 90 रुपये सुरू आहे. त्यानुसारस एलआयसीचा शेअर 1039 रुपयांवर ( 949+90=1039 रुपये) लिस्ट होण्याचा अंदाज आहे. यानुसार एलआयसीचा आयपीओ 10 टक्क्यांच्या प्रीमियमसह लाँच होऊ शकतो. 4 मे रोजी आयपीओ खुला होण्याआधी GMP मध्ये बदल होऊ शकतो. 

एलआयसी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर असणार आहेत.  केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  

(Disclaimer:  ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीसाठी आम्ही सल्ला देत नसून तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी ABPLive.Com जबाबदार राहणार नाही)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Embed widget