Archean Chemical कंपनीचा 1 हजार 400 कोटींसाठी आयपीओ 9 नोव्हेंबरला उघडणार, प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
Archean Chemical IPO: पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात कमाईची आणखी एक संधी मिळणार आहे. सागरी रसायन उत्पादक आर्चेन केमिकल इंडस्ट्रीजचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे.
Archean Chemical IPO: पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात कमाईची आणखी एक संधी मिळणार आहे. सागरी रसायन उत्पादक आर्चेन केमिकल इंडस्ट्रीजचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओबद्दलची सविस्तर माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे.
कंपनीने 1,462 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 386-407 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. प्रारंभिक शेअर विक्री 9 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 11 नोव्हेंबर रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 7 नोव्हेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील अशी माहिती Archean Chemical कडून देण्यात आली आहे.
805 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स
Archean Chemical इंडस्ट्रीज आपल्या आयपीओमध्ये 805 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहेत त्याचवेळी इंडिया रिसर्जन्स फंडसह कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार 1.61 कोटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर आणतील अशी माहिती देण्यात आली आहे.
आयपीओतून 1,462.3 कोटी उभारणे अपेक्षित
Archion Chemical इंडस्ट्रीजला आयपीओमधून 1 हजार 462 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. 75 टक्के इश्यू पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत असं कंपनीने सांगितलं आहे.
कंपनीबद्दल माहिती जाणून घ्या
आर्कियन ब्रोमिन, औद्योगिक क्षार आणि सल्फेट तयार करते आणि जगभरातील ग्राहकांना त्यांची निर्यात देखील करते. ही कंपनी गुजरातमध्ये उत्पादन घेते आणि वितरीतही करते. कंपनी गुजरातच्या किनार्यावरील कच्छच्या रणमधील मिठाच्या साठ्यातून उत्पादने तयार करते. गुजरातमधील हाजीपीर जवळील आपल्या कार्यक्षेत्रात हे उत्पादन घेतलं जातं
SME क्षेत्रातील आयपीओ तेजीत
लघु आणि मध्यम उद्योग (SME) क्षेत्रातील आयपीओमधील गुंतवणूकदारांचा कल गेल्या काही काळात वाढला आहे. या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत 87 वेगवेगळ्या SME ने आयपीओद्वारे 1,460 कोटी रुपये उभे केले आहेत. या आयपीओच्या भक्कम कामगिरीमुळेही गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे. SME उद्योगातील आकडेवारीवर नजर टाकली तर 2021 मध्ये शेअर विक्रीद्वारे 783 कोटी रुपये उभारणाऱ्या 56 कंपन्यांच्या आयपीओपेक्षा ही रक्कम खूप जास्त आहे असं दर्शविते.
इतर महत्वाच्या बातम्या:
RBI MPC Meeting: महागाईची झळ आणखी तीव्र होणार? व्याज दरात वाढ होण्याची शक्यता, RBI ची आज बैठक