एक्स्प्लोर

RBI MPC Meeting: महागाईची झळ आणखी तीव्र होणार? व्याज दरात वाढ होण्याची शक्यता, RBI ची आज बैठक

RBI Meeting: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज विशेष बैठक पार पडत असून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

RBI Meeting: वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले जात असताना महागाई (Inflation) आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा गृह कर्जासह इतर कर्जे महाग (Loan Interest rate) होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) आज व्याज दर वाढीची घोषणा करू शकते. आरबीयआयची आज विशेष बैठक आज, गुरुवारी पार पडत आहे. बुधवारी रात्री अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर आज आरबीआयची पतधोरण आढावा समितीची बैठक पार पडत आहे. 

या बैठकीत आरबीआयचे व्याज दर निश्चित करणारे पॅनलदेखील असणार आहे. या बैठकीत महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा कमी का झाला याबाबत आरबीआय केंद्र सरकारला स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर भारतातही व्याज दर वाढीची शक्यता वाढली आहे. 

आरबीआयच्या MPC ची मागील विशेष बैठक 2016 मध्ये पार पडली होती. आरबीआयची मागील बैठक 28-30 सप्टेंबर 2022 दरम्यान पार पडली होती. आरबीआयने 30 सप्टेंबर रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर 5.9 टक्के इतका झाला होता. त्यामुळे कर्जे आणखी महाग झाली होती. या बैठकीत आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रेपो दरात वाढ झाल्यास कर्जे महाग होणार आहेत. तर, मुदत ठेवीवरीलही व्याज वाढणार आहे. 

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईत वाढ

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली होती. देशाचा किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांवर पोहचला होता. याआधी, किरकोळ महागाई दर हा ऑगस्टमध्ये 7.0 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्के इतका झाला होता.  

अमेरिकेत व्याज दरवाढ 

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ कतेली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. सलग चौथ्यांदा व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेत रेपो दर 4 टक्के झाला असून 2008 नंतर हा सर्वाधिक व्याज दर आहे. अमेरिकेत मागील चार दशकातील सर्वाधिक महागाईची नोंद करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळलीAjit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Embed widget