बजाज फायनान्सनंतर आता आणखी एक IPO देणार दुप्पट रिटर्न्स? ग्रे मार्केटवर सध्या बोलबाला!
बजाज हाऊसिंग फायनान्स या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना थेट दुप्पट रिटर्न्स मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी एका आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी बजाज हाऊसिंग फायान्स (Bajaj Housing Finance) या दिग्गज कंपनीचा आयपीओ आला होता. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटन्स दिले आहेत. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच आयपीओ (IPO) मिळालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट झाले होते. पु. ना. गडगीळच्या आयपीओनेही गुंतवणूकदारांना चांगलेर रिटर्न्स दिले. त्यानंतर आता नव्याने येणाऱ्या आयपीओंकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तगडे रिटर्न्स देणाऱ्या आयपीओचा गुंतवणूकदारांकडून शोध घेतला जात आहे. असे असतानाच आता 25 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या एका आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे.
आयपीओतून 341.95 कोटी रुपये जमवणार
या या आयपीओचे नाव केआरएन हिट एक्स्चेंजर (KRN Heat Exchanger IPO) असे आहे. हा आयपीओ येत्या 25 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. केआरएन हिट एक्स्चेंजर ही कंपनी आयपीओतून 341.95 कोटी रुपये उभे करणार आहे. तर या आयपीओतून कंपनी एकूण 1.55 कोटी फ्रेश शेअर इश्यू करणार आहे.
3 ऑक्टोबर रोजी आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार
येत्या 30 ऑक्टोबर रोजी हा आयपीओ अलॉट होणार आहे. तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी आयपीओ अलॉट न होणाऱ्यांचे पैसे परत दिले जातील. ज्या लोकांना आयपीओ अलॉट झालेला आहे, त्याच्या डी-मॅट खात्यात 1 ऑक्टोबर रोजी शेअर पाठवले जातील. तर 3 ऑक्टोबर रोजी हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.
एका लॉटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
या आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण 65 शेअर्स असतील. तर ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 15,543,000 शेअर्स विकणार आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर ही कंपनी सूचिबद्ध होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा हा प्रति शेअर 209 ते 220 रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 14,300 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा बोलबाला
केआरएन हिट एक्स्चेंजर हा मेनबोर्ड सेगमेंटचा आयपीओ आहे. सध्या हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय. या आयपीओचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 102 टक्के प्रिमियमवर आहे. म्हणजेच शेअर बाजारावर लिस्ट होताना या कंपनीच्या शेअरचे मूल्य थेट 443 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना थेट दुप्पट परतावा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
आयफोनवर 15 वर तब्बल 35000 रुपयांची सूट, 'बिग बिलियन डे'मध्ये प्रो आणि मॅक्स मॉडेल एका लाखात मिळणार!