शेअर मार्केटचा किंग व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!
शेअर बाजारात पैसे गुंतवणून श्रीमत व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ही काळजी घेतल्यास नुकसान होऊ शकते.
मुंबई : प्रत्येकालाच श्रीमंत व्हावेसे वाटते. त्यासाठी अनेकजण शेअर बजाराचा मार्ग धरतात. पण येथे एकाच दिवशी कोणी कोट्यवधी रुपये कमवतो, तर त्याच क्षणाला एखाद्या व्यक्तीचे लाखो रुपये बुडतात. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investing) करताना सजग राहणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर असे सहा मंत्र जाणून घेऊ या, जे तुम्हाला शेअर बाजारात चांगले पैसे कमवून देऊ शकतात.
दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची
अनेक गुंतवणूकादारांना कमी कालावधीत जास्त रिटर्न्स हवे असतात. पण दीर्घकालीन गुंतवणूक ही तुलनेने फायद्याची ठरू शकते. शेअर बाजारात नुकतेच पाऊल ठेवलेल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचाच सल्ला दिला जातो. कमी कालावधीत नफा मिळवण्यापेक्षा दीर्घकाळ गुंतवणुकीच्या माध्यमातून जास्त नफा मिळवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असायला हवा. एकदा गुंतवलेले पैसे काही काळासाठी राहू द्या. दीर्घकाळाच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळेल, असे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला सांगायचे.
शेअरची किंमत नव्हे तर कंपनीचे मूल्य पाहा
अनेक गुंतवणूकदार शेअरची किंमत पाहून गुंतवणूक करतात. मात्र शेअरची किंमत पाहण्यापेक्षा त्या कंपनीचे मूल्य काय आहे, याच अभ्यास करायला हवा. ज्या कंपनीच्या शेअरचे मूल्य जास्त आहे, त्याच कंपनीत अनेकजण गुंतवणूक करतात. मात्र शेअरची किंमत जास्त असलेल्या कंपन्या तुम्हाला चांगले रिटर्न्स देतीलच असे नसते. अशा कंपन्यांच्या मागील एक ते पाच वर्षांपर्यंतचा परफॉर्मन्स पाहायला हवा.
जास्त रिटर्न्स जास्त रिस्क
बँकेत ठेवलेला पैसा सुरक्षित असतो. येथे पैसे बुडण्याचा धोका नसतो. पण शेअर बाजारात तसे नसते. तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य कमीदेखील होऊ शकते. येथे पैसे बुडण्याचा धोका असला तरीदेखील बँकेच्या तुलनेत येथे जास्त रिटर्न्स मिळतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवण्याआधी तुम्ही त्या कंपनीचा संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती एखाद्या कंपनीत पैसे गुंतवतेय म्हणून तुम्हीदेखील त्या कंपनीत पैसे गुंतवणे चुकीचे आहे. पूर्ण अभ्यास करूनच शेअर बाजारात पैसे गुंतवायला हवेत.
कंपनीकडे पैसे किती आहेत, हे तपासावे?
शेअर बाजारात एखादी कंपनी लोकांना चांगले रिटर्न्स देत आहे, म्हणजे ती चांगलीच आहे, असा नियम नाही. हे ठरवण्याआधी तुम्ही कंपनीचा याआधीचा इतिहास तपासला पाहिजे. या कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड दिलेला आहे का? हे तपासावे. डिव्हिडेंड हा शेअर बाजारात फार महत्त्वाचा घटक आहे. एखादी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड देत आहे म्हणजेच त्या कंपनीकडे कॅश पैशांची कमी नाही. अशा कंपन्या शेअर बाजारात चांगली कामगिरी करतात.
कंपनीच्या कर्जाचीही माहिती घ्या
कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवण्याआधी त्या कंपनीवर कर्ज आहे की नाही हे तपासले पाहिजे. कंपनीच्या डोक्यवर कर्ज नाही, म्हणजे तिच्यावर ते फेडण्याचाही दबाव नाही, असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या कंपनीवर कर्ज आहे म्हटल्यावर त्या कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे कंपनीवरील कर्जाचा अभ्यास करणे गरेजेचे आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
खुशखबर! जुलै-ऑगस्टमध्ये मिळणार पीएफवरील व्याज, जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?
34 व्या वर्षी अब्जाधीश झालेले निखील कामथ संपत्ती दान करणार? वाचा मुलासंदर्भात त्यांचे विचार काय?
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स