फक्त 2000 रुपयांची एसआयपी करा, कमी काळात श्रीमंत व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती
तुम्ही जर पैशांचे योग्य नियोजन करुन गुंतवणूक केली तर तुम्ही मोठा निधी उभारु शकता. तुम्ही जर तुमचे खर्च कमी करून महिन्यात फक्त 2000 रुपये वाचवत असाल तर ते तुम्हाला श्रीमंत बनवण्यास खूप उपयुक्त ठरेल.

Investments Plan : आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे असणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकाची इच्छा असते की लवकरात लवकर जास्त पैसे कमवावेत आणि श्रीमंत व्हावे. एक आलिशान घर, मोठी गाडी असावी असं सर्वांना वाटते. परंतू, कमी उत्पन्नामुळे लोक त्यांचे सर्व पैसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात खर्च करत आहेत. काही लोक त्यांच्या कर्जाच्या ईएमआय भरण्यात पैसे खर्च करत आहेत. काही घरगुती खर्च व्यवस्थापित करण्यात तर काही वैद्यकीय खर्चासारख्या गोष्टींमध्ये. काहींकडे महिनाभर चालण्यासाठीही पैसे शिल्लक राहत नाहीत. पण तुम्ही जर पैशांचे योग्य नियोजन करुन केली तर तुम्ही मोठा निधी उभारु शकता.
अनेकजण मित्र किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेतात. हळूहळू, ते या चक्रव्यूहात इतके अडकतात की श्रीमंत होण्यापासून दूर राहून त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य कर्जातून बाहेर पडण्यात घालवावे लागते. पण तुम्ही जर तुमचे खर्च कमी करून महिन्यात फक्त 2000 रुपये वाचवत असाल तर ते तुम्हाला श्रीमंत बनवण्यास खूप उपयुक्त ठरेल. तुम्हाला हे पैसे दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मध्ये गुंतवावे लागतील आणि नंतर तुम्हाला काही वर्षे वाट पहावी लागेल.
2000 रुपयांच्या एसआयपीमधून तुम्ही किती कमाई करु शकता?
जर तुम्ही 2000 रुपयांच्या एसआयपीचा हिशोब केला तर 25 वर्षांनी तुम्ही मोठी रक्कम कमवू शकता. समजा तुमचा 2000 रुपयांचा एसआयपी 12 टक्के परतावा देत आहे आणि तुम्ही 25 वर्षे सतत गुंतवणूक करत राहिलात तर तुमच्याकडे 34 लाख 04 हजार 413 रुपये असतील. ज्यामध्ये तुमची गुंतवणूक फक्त 6 लाख रुपये असेल आणि परतावा 28 लाख 04 हजार 413 रुपये असेल.
गुंतवणूकदारांनी काय करावं?
एसआयपी हा एक गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. परंतू, तो एक लक्ष्य समोर ठेऊन केला पाहिजे. तुमची उद्दिष्टे कळल्यानंतर, त्या लक्ष्यानुसार एसआयपी सुरू करता येते. याचा अर्थ निवृत्ती, मुलांचे शिक्षण, आपत्कालीन निधी किंवा घराचे डाउन पेमेंट यासारख्या गोष्टींसाठी किती पैसे आवश्यक आहेत हे शोधणे आणि त्यानंतर त्यानुसार गुंतवणुकीचे नियोजन करणे. दरम्यान, पैशांची गुंतवणूक करताना नागरिकांनी दोन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरं म्हणजे आपण ठेवणाऱ्या ठेवीवर किती परतावा मिळणार या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अलिकडच्या काळात कमी काळात अधिक नफा मिळवून देणाऱ्या विविध योजना आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























