Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी 15x15x15 नियम आजही लागू होतो? म्युच्युअल फंडाशी संबंधित नियमाबाबत तज्ज्ञांचा सल्ला
Investment Tips : काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, म्युच्युअल फंडाच्या प्रकारानुसार 15 वर्षानंतर 15 टक्के परतावा मिळणे शक्य आहे.
Investment Tips : शेअर बाजारातील वाढ आणि घसरण यामुळे म्युच्युअल फंड हा अनेक गुंतवणूकदारांचा पसंतीचा पर्याय बनला आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक नियम आहेत, विशेषत: नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणूक कशी करावी याची प्राथमिक कल्पना मिळावी. असाच एक नियम 15x15x15 आहे. ज्यानुसार गुंतवणूकदार केवळ 15 वर्षांत करोडपती होऊ शकतो.
या नियमानुसार गुंतवणूकदाराला 15 वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये दरमहा 15,000 रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यातून 15 टक्के दराने परतावा अपेक्षित आहे. चक्रवाढ व्याजाच्या गणनेनुसार, 15 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला मिळणारी रक्कम 1 कोटी रूपये इतकी असेल. मात्र, 15x15x15 नियम आजही लागू होतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या संदर्भात तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. जाणून घ्या.
हा नियम आजही लागू होतो का?
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, म्युच्युअल फंडाच्या प्रकारानुसार 15 वर्षानंतर 15 टक्के परतावा मिळणे शक्य आहे. “म्युच्युअल फंडाचा 15 वर्षांचा परतावा स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅपवर अवलंबून सुमारे 15 टक्के असेल. जेव्हा एखादा गुंतवणूकदार 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करत असतो तेव्हा हे शक्य आहे.” असे Wiseinvest Pvt Ltd चे CEO हेमंत रुस्तगी म्हणाले.
ते असेही म्हणाले की, जर वेळ क्षितिज 10 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि एखादी व्यक्ती इक्विटी-संबंधित फंडांमध्ये गुंतवणूक करत असेल तर 15 टक्क्यांपेक्षा 12 टक्के गृहीत धरणे अधिक सुरक्षित आहे.
तसेच, इन्व्हेस्टोग्राफी प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक, श्वेता जैन म्हणाल्या, “हा नियम भारतात अगदी समर्पक आहे. 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रूपयांची गुंतवणूक करा. परंतु, गुंतवणूकदारांनी हेदेखील लक्षात घेण्याची गरज आहे की, बाजार अस्थिर आहे. त्यामुळे त्यांना कमी परतावा देखील मिळू शकतो. या सगळ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिस्तबद्ध आणि वचनबद्ध असणं गरजेचं आहे. तसेच, तुमचं तुमच्या ध्येयावरही लक्ष असणं गरजेचं आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली आहे. तसेच, पुढे जाणाऱ्या बाजारांमुळे कदाचित 15 टक्के परतावा मिळणार नाही, परंतु सध्या गुंतवणूक सुरू करण्यासाठी, हा एक उत्तम पर्याय आहे.
स्काय फायनान्शिअलचे सीईओ मेहुल आशर म्हणतात, “15x15x15 हा नियम आता वैध नाही कारण इतक्या वर्षांच्या कालावधीत सरासरी 15 टक्के परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण पोर्टफोलिओ तयार करताना गुंतवणूकदारांना 50-60 टक्के गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये करावी लागेल आणि जर त्यांच्याकडे लार्ज कॅप पोर्टफोलिओ असेल तर तो 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या :