(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5 हजारांत व्हाल लखपती, मिळतील तब्बल 5700000 रुपये, जाणून घ्या 5-12-20 फॉर्म्यूला नेमका आहे तरी काय?
अगदी पाच हजारांची गुंतवणूक करून तुम्ही थेट लखपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 5-12-20 फॉर्म्यूल्याचे पालन करावे लागेल. हा फॉर्म्यूला नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या...
प्रत्येकालाच श्रीमंत व्हावसं वाटतं. त्यासाठी अनेकजण अहोरात्र मेहनत घेत असतात. अनेक तरूण-तरुणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजेच लखपती, करोडपती होण्यासाठी वेगवेगळे उद्योग, व्यवसाय उभारतात. यात काहींना यश येतं तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं.पण नोकरी करून मिळणाऱ्या पैशांतही तुम्ही लखपती होऊ शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला योग्य ठिकाणी गुतंवणूक करावी लागेल. म्युच्यूअल फंड म्हणजेच एसआयपी हा गुंतवणुकीसाठीचा चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून 5 हजारांची गुंतवणूक करून तुम्ही थेट लखपती होऊ शकता. ते कसं शक्य आहे? त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? हे जाणून घेऊ या...
एसआयपीत मिळतो 12 टक्क्यांनी परतावा
नोकरी करून मिळणारे पैसे जर एसआयपीत गुंतवले तर तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता. त्यासाठी एसआयपी करताना तुम्हाला 5X12X20 हा फॉर्म्यूला पाळावा लागेल. एसआयपी हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. म्युच्यूअल फंड म्हणजेच एसआयपीत हा शेअर बाजाराशी निगडीत असतो. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळू शकतो. पण दीर्घकालीन एसआयपी गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्क्यांनी परतावा मिळतो असे ग्रहीत धरले जाते.
5X12X20 हे सूत्र आहे तरी काय?
वर उल्लेख केल्याप्रमाणे एसआयपी करताना 5X12X20 या सूत्राचा वापर केला, तर तुम्ही लखपती होऊ शकता. 5X12X20 या सूत्रातील 5 या आकड्याचा अर्थ 5000 रुपये असा आहे. 12 म्हणजे 12 टक्क्यांनी परतावा, तसेच 20 हा आकडा म्हणजे 20 वर्षांसाठी गुंतवणूक असा या सूत्राचा अर्थ आहे. म्हणजेच तुम्ही करत तुम्हाला लाखपती व्हायचे असेल तब्बल 50 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक सलग 20 वर्षे केली तर तुम्हाला तब्बल जवळजवळ 50 लाख रुपये मिळू शकतात.
5000 हजारांनी गुंतवणूक केल्यास नेमके किती रुपये मिळतील?
तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5000 याप्रमाणे सलग 20 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्ही या 20 वर्षात एकूण 12,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. गुंतवलेल्या या पैशांवर तुम्हाला 37,95,740 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला 20 वर्षांनी एकूण 49,95,740 रुपये मिळतील. म्हणजेच 20 वर्षांनी तुम्ही लखपती व्हाल.
हेही वाचा :
CV ठेवा तयार! 80 हजार तरुणांना मिळणार नवीन नोकऱ्या, 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी