पोस्टाची भन्नाट योजना! 5 लाख गुंतवा, 10 लाख मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती
पोस्ट ऑफिस योजनांमध्ये कोणताही धोका नाही. जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील पोस्टाच्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा मिळतो.
Post Office Scheme: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (invetsment) महत्व वाढत आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दरम्यान, गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. पोस्ट ऑफिसकडून (Post Office) अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्यामुळे लोकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनांमध्ये धोका नगण्य आहे. जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील पोस्टाच्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा मिळतो.
किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र (KVP) ही पोस्टाची लोकप्रिय योजना आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होतात. या योजनेत, तुम्ही 100 च्या पटीत किमान 1000 रुपयापासून गुंतवणूक करु शकता. विशेष म्हणजे यामध्ये कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे या योजनेत तुम्ही गुंतवू शकता. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यालाही मर्यादा नाही. 2, 4, 6 तुम्ही किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता.
या योजनेवर व्याजदर किती?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते. या योजनेतील गुंतवणुकीवर चांगला व्याजदर असल्यानं फायद्याचे ठरते.
5 लाख रुपये गुंतवा 10 लाख रुपये मिळवा
जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत पैसे ठेवले तर 7.5 टक्के व्याजाच्या आधारे 5 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर 10 लाख रुपये मिळतील. त्यामुळं या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. दरम्यान, ज्या नागरिकांना पैशाची गुंतवणूक करायची आहे, त्यांनी पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करावी. कारण या योजनेत मिळणारा परतावा चांगला आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळं या योजनेत कमी काळात अधिक फायदा मिळतो.
महत्वाच्या बातम्या: