पैशांची गुंतवणुक करायचीय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा, भरघोस नफा मिळवा
गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या (Post Office Schemes) काही योजना देखील चांगल्या आहेत. या योजनांवर चांगला परतावा मिळतो. जाणून घेऊयात सवि्तर माहिती.
Post Office Schemes : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investmet) महत्व वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनचं गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दरम्यान, गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेली गुंतवणूक सुरक्षीत ठिकाणी आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो? या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दरम्यान, गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या (Post Office Schemes) काही योजना देखील चांगल्या आहेत. या योजनांवर चांगला परतावा मिळतो. जाणून घेऊयात सवि्तर माहिती.
तुम्ही जर गुंतवणुकीचा योग्य मार्ग शोधत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे. पोस्ट ऑफिसच्या काही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा काही 5 वर्षांच्या योजना आहेत ज्यात 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दिले जाते. जाणून घेऊयात या योजनांबद्दल सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिस एफडी योजना
पोस्ट ऑफिस एफडी योजना ही देखील गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली योजना आहे.
बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील वेगवेगळ्या कालावधीसह अनेक प्रकारचे मुदत ठेवी (FD) पर्याय आहेत. पण जर तुम्हाला चांगले व्याज मिळवायचे असेल तर तुम्ही 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या या एफडीवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. इतर बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत चांगले व्याज मिळते. त्यामुळं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही मासिक उत्पन्न मिळवून देणार आहे. यामध्ये एका खात्यात 9 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आणि संयुक्त खात्यात 15 लाखांपर्यंतची रक्कम जमा केली जाऊ शकते. ठेवींवर 7.4 टक्के दराने व्याज दिले जाते. या व्याजातून कमाई होते. संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा करून, या योजनेतून प्रत्येक महिन्याला 9,250 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. दरम्यान, गुंतवणुकीसाठी पोस्टाची ही योजना उत्तम मानली जाते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही देखील एक चांगली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. यामध्येही 5 वर्षांसाठी रक्कम जमा केली जाते. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक चांगली कमाई करू शकतात. 8.2 टक्के हा व्याजदर चांगला आहे. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) हा देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत 5 वर्षांसाठी पैसेही जमा केले जातात. सध्या 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तुम्ही यामध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. 7.7 टक्के हा व्याजदर चांगला आहे.
महत्वाच्या बातम्या: