एक्स्प्लोर

Infosys Salary Hikes : आठवड्यात 72 तास काम करा म्हणणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ, 'इतक्या' टक्क्यांनी वाढले पगार

Infosys Salary Hike : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात पगारवाढ मिळणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक तिमाहीत कंपनीने चांगला महसूल कमावल्याचं दिसून आलं. 

मुंबई : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8 टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे. ही वेतनवाढ जानेवारी आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. या आधी नोव्हेंबर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी कर्मचाऱ्यांना आठवड्यात 72 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. 

इन्फोसिस कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित चांगली महसूल वाढ नोंदवली होती. कंपनीने या काळात 11 टक्क्यांची वाढ नोंदवली असून 6,806 कोटी रुपयांचा घसघशीत महसूल कमवला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्यात तिमाहित हा फायदा 6,106 कोटी रुपये इतका होता. 

1 जानेवारीपासून वेतनात वाढ

इन्फोसिसने जाहीर केलेली वेतनवाढ ही दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून जॉब लेव्हल 5 च्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करण्यात येणार असून ती फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जॉब लेव्हल 6 च्या कर्मचाऱ्यांना, मार्चपासून वेतनवाढ लागू करण्यात येणर असून ती एप्रिलमध्ये मिळणार आहे.

जॉब लेव्हल 5 मध्ये इंजिनिअर, सिनिअर इंजिनिअर, सिस्टिम इंजिनिअर, कन्सलटंट यांचा समावेश होतो. तर जॉब लेव्हल 6 मध्ये मॅनेंजर, सिनिअर मॅनेंजर, डिलिव्हरी मॅनेंजर आणि सिनिअर डिलिव्हरी मॅनेंजर यांचा समावेश होतो. 

भारतीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांन कमी प्रमाणात वेतन वाढ होणार आहे. पण चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला चांगले वेतन वाढ होणार असल्याची माहिती इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी सांगितलं.  

इन्फोसिस Q3 FY25 रिझल्ट

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने डिसेंबर तिमाहीत 41,764 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, तर कंपनीचा PAT या कालावधीत 6,806 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा YoY आधारावर 11% ने वाढून Rs 6,806 कोटी झाला आहे. तर ऑपरेशन्समधील महसूल 7.6% ने वाढून Rs 41,764 कोटी झाला आहे. 

देशातील आघाडीच्या IT कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी आपले रेव्हेन्यू गायडेंडमध्ये बदल करून ते 4.5% ते 5% केले आहे. कंपनीचा एकत्रित EBIT Q3  3% ने वाढून 8912 कोटी रुपये इतका झाला आहे. त्याच वेळी, डिसेंबर तिमाहीत कंपनीचे EBIT मार्जिन QoQ आधारावर 21.1% वरून 21.3% पर्यंत वाढलं आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
Embed widget