मुकेश अंबानींकडून मोठी घोषणा! जिओ वापरकर्त्यांना दिवाळीत जबरदस्त गिफ्ट, 'ही' गोष्ट मिळणार अगदी मोफत!
रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील कोट्यवधी जिओ युजर्सना मोठा फायदा होणार आहे.
Jio AI Cloud: रिलायन्स इंडिस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून देणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी जिओ एआय क्लाउड (Jio AI-Cloud) ऑफरची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गंत जिओ युजर्सना वेलकम ऑफर म्हणून तब्बल 100 जीबी क्लाउड स्टोरेज मोफत मिळणार आहे. जिओ एआय क्लाउड (Jio AI-Cloud Welcome offer) याच वर्षी दीपावलीच्या मुहूर्तावर लॉन्च केले जाणार आहे. जिओ कंपनीच्या या निर्णयानंतर या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याआधी अॅपल कंपनीतर्फए आयक्लाऊड अंतर्गत फक्त 5GB पर्यंत फ्री स्टोअरेज दिले जाते . गुगलतर्फे आपल्या युजर्सना फक्त 15GB फ्री क्लाऊड स्टोअरेज दिले जाते. मात्र आता जिओतर्फे त्यांच्या युजर्सना वेलकम ऑफर अंतर्गत तब्बल 100 जीबी फ्री क्लाऊड स्टोअरेज दिले जाणार आहे.
क्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय?
क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा डेटा स्टोअर करता येतो. क्लाऊड स्टोअरेजमध्ये डेटाला डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवले जाते. क्लाऊड स्टोअरेजच्या मदतीने मोबाईल फोन किंवा कॉम्यूटर वापरकर्ते एका वेगळ्या सर्व्हरवर त्यांचा डेटा सेव्ह करून ठेवतात. या सर्व्हरची देखभाल एका थर्ड पार्टीकडून केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित युजरला हा डेटा वापरता येईल, याची खबरदारी घेतली जाते.
Google कडून मिळते 15GB स्टोअरेज
गुगल कंपनीकडून गुगल वापरकर्त्यांन 15 जीबीचे मोफत फ्री क्लाऊड स्टोअरेज मिळते. या स्टोअरेजमध्ये युजर्स फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे किंवा अन्य डिजिटल माहिती स्टोअर करून ठेवू शकतात. 15 जीबी हा मोफत डेटा वापरून झाल्यानंतर गुगल वापरकर्त्यांना पैसे खर्च करून क्लाऊड स्टोअर खरेदी करावा लागते.
गुगलतर्फे 100जीबी स्टोअरेजसाठी प्रतिमहिना 35 रुपये आकारले जातात. तुम्हाला दोन टीबी क्लाऊड स्टोअरेज हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रतिमहिना 160 रुपये मोजावे लागतात. बिझनेस युजर्सना गुगल 100 जीबी फ्री क्लाउड स्टोअरेज देते.
iCloud तर्फे किती स्टोअरेज मोफत मिळते?
अॅपल कंपनीद्वारे वापरकर्त्यांना फक्त 5 जीबी मोफत क्लाउड स्टोअरेज दिले जाते. त्यानंतर वापरकर्त्यांना पैसे देऊन आय क्लाऊड स्टोअरेज खरेदी करावे लागते. आयक्लाउड स्टोअरेजसाठी वापरकर्त्यांना 50 जीबी स्टोअरेजसाठी प्रतिमाह 75 रुपये मोजावे लागतात. 200जीबी स्टोअरेजसाठी प्रतिमाह 219, 2 टीबी स्टोअरेजसाठी प्रतिमाह 749 रुपये, 6 टीबी स्टोअरेजसाठी प्रतिमाह 2999 रुपये, 12 टीबी स्टोअरेजसाठी प्रतिमाह 5900 रुपये द्यावे लागतात.
हेही वाचा :
टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?