Stock Market Opening: आज शेअर बाजार घसरणीसह उघडला, सेन्सेक्स पुन्हा 59000 च्या खाली
Stock Market Opening : आज सेन्सेक्स पुन्हा 59000 अंकांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 72 अंकांनी घसरून 17,439 वर आहे.
Stock Market Opening : आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील (Share Market Update) घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) घसरणीने उघडला आहे. गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 282 अंकांच्या घसरणीसह 58824 वर उघडला. सेन्सेक्स पुन्हा 59000 अंकांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 72 अंकांनी घसरून 17,439 वर आहे.
शेअर्सचा घसरणीसह व्यवहार
बाजारात एफएमसीजी निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, धातू, रिअल इस्टेट, मीडिया, ऊर्जा तेल आणि वायू आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्र घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 9 शेअर्स वाढीसह आणि 41 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 6 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत, तर 24 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज बाजारात नेस्ले 1.46 टक्के, रिलायन्स 0.77 टक्के, आयटीसी 0.58 टक्के, एशियन पेंट्स 0.53 टक्के, एचयूएल 0.41 टक्के, सिप्ला 0.12 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.11 टक्के आणि अॅक्सिस बँक 0.10 टक्के आहे.
1866 शेअर्समध्ये घसरण
घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकल्यास, इंडसइंड बँक 3.43 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.39 टक्के, ओएनजीसी 1.33 टक्के, हिंदाल्को 1.26 टक्के, कोल इंडिया 1.20 टक्के, एनटीपीसी 1.10 टक्के, बजाज ऑटो 1.09 टक्के, एचडीएफसी 1.2 टक्के आहे. बाजारातील 3571 शेअर्सच्या व्यवहारात 1567 शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत, तर 1866 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 138 शेअरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 75 शेअर्सचे भाव त्यांच्या आयुष्यातील उच्चांकावर व्यवहार करत आहेत. 39 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.
बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर
या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दिवाळी आधी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू आहे. काल बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 146 अंकांनी वधारत 59,107 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 30 अंकांच्या तेजीसह 17,516 अंकांवर बंद झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai Firecrackers : मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी, पोलिसांकडून आदेश जारी