इयत्ता 8 वी पास असले तरी थेट नौदलात मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर!
भारतीय नौदलाने नोकरीच्या शोधात असणाऱ्या मुलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अर्जप्रक्रिया चालू झाली आहे.
मुंबई : अनेकजण आयुष्यात स्थिर नोकरीच्या शोधात असतात. त्यातही सरकारी नोकरीला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र सुरुवातीच्या काळात शिकाऊ उमेदवार म्हणून एखाद्या शासकीय खात्यात संधी मिळाल्यास भविष्यात चांगला पगार मिळू शकतो. भारतीय नौदलाने तरुणांना आता ही संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy Jobs) एकूण 300 पदांसाठी शिकाऊ (अप्रेंटिस) उमेदवारांसाठी भरती काढली आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे.
भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी शिकाऊ उमेदवार (Indian Navy Jobs 2024) म्हणून रुजू होण्याची इच्छा असणाऱ्यांना सध्या नामी संधी चालून आली आहे. नौदलातर्फे वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. येत्या 10 मेपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी फक्त आठवी आणि दहावी पर्यंत शिक्षण शिकललेदेखील अर्ज करू शकतात.
कोणकोणत्या पदांसाठी होणार भरती
भारतीय नौदलात वेगेगळ्या 300 पदांसाठी अप्रेंटशिपसाठी भरती होणार आहे. यात फिटर पदासाठी 50, मेकॅनिक पदासाठी 35, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी 26 जागा आहेत. शिपराइट 18, वेल्डर 15, मशीनिस्ट 13, एमएमटीएम 13, पाईप फिटर 13, पेंटर 9, इंस्ट्रूमेन्ट मेकॅनिक 7, शीट मेटल वर्कर 3, टेलर 3, पॅटर्न मेकर 2, फाऊन्ड्रीमॅन पदासाठीदेखील एक जागा आहे.
वयोमर्यादा काय, शिक्षणाची अट काय?
भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीसाठी किमान वयाची अट ही 14 वर्षे आणि कमाल वयाची अट ही 18 वर्षे आहे. बिगर आयटीआय ट्रेडसाठी इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे. फोर्जर हीट ट्रिटर या पदासाठी इयत्ता 10 पास असणे गरजेचे आहे.
शारीरिक योग्यतेची अट काय?
या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची उंची ही 150 सेमी तर वजन 45 किलोपेक्षा कमी नसावी. तसे छाती फुगवल्यानंतर ती 5 सेमीपेक्षा कमी नसावी. डोळ्यांची दृष्टी ही 6/6 पासून 6/9 पर्यंत असणे गरजेचे आहे.
निवड कशी होणार, पगार काय मिळणार?
भारतीय नौदलात वरील पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अगोदर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झाल्यास उमेदवाराला प्रतिमहिना 7700 ते 8050 रुपयांचे स्टायपंड मिळेल.
हेही वाचा :
अंबानी, टाटा ते शाहरुख खान, देशातली पाच आलिशान घरं, ज्यांची किंमत वाचून धक्क व्हाल!
HDFC, येस बँक ते गॅस सिलिंडर, 1 मे पासून 'हे' नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर? चार मसाल्यांची विक्री थांबवण्याचा आदेश!