(Source: Poll of Polls)
भारतीय लोकांच्या उत्पन्नात होतेय झपाट्यानं वाढ, 10 कोटी लोकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या पुढे जाणार
भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) झपाट्यानं वाढ होत असल्यानं भारतीयांचे उत्पन्नही वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग झपाट्याने वाढणार आहे.
Indian Income: भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) झपाट्यानं वाढ होत असल्यानं भारतीयांचे उत्पन्नही वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जसजशी प्रगती करत आहे, तसतशी भारतीयांची समृद्धीही वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग झपाट्याने वाढणार आहे. चांगली कमाई करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास जागतिक बँकिंग समूह गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे. येत्या तीन वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी होईल. म्हणजे ज्यांची वार्षिक कमाई 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त असेल असे लोक समृद्ध भारतीयांच्या श्रेणीत असतील. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 8 लाख 30 हजार रुपये होते.
गोल्डमन सॅक्सने शुक्रवारी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. येत्या तीन वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी होईल. अहवाल तयार करताना, गोल्डमन सॅक्सने अशा लोकांना समाविष्ट केले आहे ज्यांची वार्षिक कमाई 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त असेल. समृद्ध भारतीयांच्या श्रेणीत भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 8 लाख 30 हजार रुपये होते.
6 कोटी भारतीय श्रीमंत
गोल्डमन सॅक्सने अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत वार्षिक 8.30 लाख रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अहवालानुसार, 2015 मध्ये भारतात 2.4 कोटी लोक होते जे वार्षिक 8.30 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत होते. या श्रेणीतील लोकांची संख्या आता 6 कोटी झाली आहे. याचाच अर्थ गेल्या 8 वर्षांत 8.30 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या अडीच पटीने वाढली आहे.
समृद्धीमुळं प्रीमियम वस्तूंची मागणी वाढेल
भारताच्या प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत, 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांची संख्या अजूनही खूपच कमी आहे. हे लोकसंख्येच्या फक्त 4.1 टक्के आहे. अहवालातील अंदाज सूचित करतात की येत्या काही वर्षांत टक्केवारी सुधारु शकते. गोल्डमन सॅक्स म्हणतात की, भारतात श्रीमंत लोकांची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल तसतशी प्रिमियम वस्तूंची मागणीही देशात वाढेल.
या कारणांमुळे भारतीयांची समृद्धी वाढली
गोल्डमन सॅक्सच्या 'समृद्ध भारत' अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत भारताला अनेक घटकांकडून मदत मिळाली आहे. जागतिक बँकिंग फर्मच्या मते, गेल्या दशकात देशाची वेगवान आर्थिक वाढ, स्थिर चलनविषयक धोरण आणि उच्च पत वाढ यामुळे भारतीयांची भरभराट झाली आहे. भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे 2,100 डॉलर म्हणजेच वार्षिक 1.74 लाख रुपये झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: