एक्स्प्लोर

2050 पर्यंत भारत 25 ते 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल: गौतम अदानी

Gautam Adani: अदानी समूह देशातील सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करून सर्वात फायदेशीर कंपनी बनण्याच्या तयारीत आहे. 650 कोटी डॉलर्समध्ये अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण झाल्याबद्दल 17 सप्टेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Gautam Adani: अदानी समूह देशातील सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करून सर्वात फायदेशीर कंपनी बनण्याच्या तयारीत आहे. 650 कोटी डॉलर्समध्ये अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण झाल्याबद्दल 17 सप्टेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, ''2050 पर्यंत भारत 25 ते 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल.''

या कार्यक्रमात बोलताना  गौतम अदानी म्हणाले की, मला अनेकदा प्रश्न विचारला जातो की, सिमेंट का? म्हणूनच या निमित्ताने मी या व्यवसायात प्रवेशामागील तर्काबद्दल विस्ताराने बोलणार आहे. भारताच्या विकासपथावर आमचा अढळ विश्वास असून 2050 पर्यंत भारत 25 ते 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल. आमच्या या धारणेपासून याची सुरुवात होते. संलग्न आकडेवारी तुम्हा सर्वांना आहे, तरी  भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे. आपला दरडोई वापर चीनच्या 1,600 किलोच्या तुलनेत फक्त 250 किलो आहे. म्हणजे वाढीसाठी जवळजवळ सात पटीने वाव असल्याचे हे यात दिसते. शिवाय सरकारच्या अनेक कार्यक्रमांना गती मिळाल्याने, सिमेंटच्या मागणीतील दीर्घकालीन सरासरी वाढ जीडीपीच्या 1.2 पट ते 1.5 पट असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आमचा अंदाज या संख्येच्या दुप्पट वाढ होण्याचा आहे. 

अदानी पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील ट्रिलियन-डॉलरच्या गुंतवणुकीसह आपल्या देशाच्या विकासाची गोष्ट उलगडत असताना, सिमेंट हा आपल्या पायाभूत सुविधा व्यवसायासाठी, विशेषत: समूहाचा बंदरे आणि दळणवळण / लॉजिस्टिक व्यवसाय, हरित ऊर्जा व्यवसाय आणि विकसित होत असलेल्या ई-कॉमर्स व्यासपीठ या सर्वांसाठी एक समर्पक जोड व्यवसाय ठरेल. या संलग्नता आम्हाला महत्त्वपूर्ण स्पर्धात्मक फायदा देतात. आम्हाला त्यायोगे अतुलनीय प्रमाणात लाभ मिळवण्याच्या स्थितीत राखतात. माझा असाही विश्वास आहे की,  अदानी समूहासारखा परिचालन कार्यक्षमते इतकी सक्षमता असणारे आजच्याघडीला दुसरे कोणीही नाही. त्यामुळेच मागील वर्षांमध्ये आम्ही केलेल्या अनेक अधिग्रहणांमधून आम्हाला निश्चितच फायदा होईल. परिणामी, आम्ही लक्षणीय मार्जिन विस्ताराने देशातील सर्वात फायदेशीर सिमेंट उत्पादक बनण्याची आशा राखतो. ते म्हणाले,  सध्याच्या 710 दशलक्ष टन क्षमतेवरून पुढील पाच वर्षांत 140 दशलक्ष टनांपर्यंत जाण्याचा आमचा अंदाज आहे. माझ्या या आत्मविश्वासामागे बळ हे एसीसी आणि अंबुजा यांच्याकडून मिळणाऱ्या नेतृत्वाच्या एकत्रित ताकदीने दिले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ते म्हणाले आहेत की, आपण करत असलेली प्रत्येक कृती ही राष्ट्राच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असावी आणि ती याच विश्वासाच्या दृष्टीकोनातून प्रेरीत असली पाहिजे. 

गौतम अडाणी म्हणाले की, ''मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, भारतात होल्सिमच्या सिमेंट मालमत्तेचे संपादन हे भारतातील पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा देशांतर्गत पार पडलेला ताबा व विलीनीकरण व्यवहार आहे. अलीकडच्या काळात आम्ही केलेल्या अनेक मोठ्या व्यवहारांपैकी हा एक आहे. अदानी समूहाच्या या वाढीमागे नेमके कोणते तत्त्वज्ञान आहे. याबद्दल लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न आहे. या तत्त्वज्ञानाची घडणी भारताच्या विकासाच्या यशोगाथेवरील आपल्या दृढ धारणेतून आणि राष्ट्र उभारणीवरील आपल्या विश्वासातून होते. नवीन उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत हे साकारण्याचे सामर्थ्य,  दृढनिश्चयी स्वावलंबनातून किंवा आपल्यापैकी बरेच जण ज्याला ‘आत्मनिर्भरता’ म्हणतात, त्यातून येईल या विश्वासातून हे तत्त्वज्ञान पुढे येते. आपल्या देशाच्या विकासाला गती देणार्‍या चार मात्रांचे भांडवल करण्याच्या दिशेने भारत ज्या सुस्थितीत आहे, तसे जगातील अन्य कोणतेही राष्ट्र नाही या विश्वासातून या तत्त्वज्ञानाची मांड पक्की होते.'' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget