भारत बनतोय श्रीमंतांचा देश, 2023 मध्ये श्रीमंतांच्या संख्येत झाली 'एवढी' वाढ
अलीकडच्या काळात देशातील श्रीमंत लोकांच्या संख्येत वाढ (Rich People) होतोना दिसत आहे. भारत आता श्रीमंतांचा देश बनत चालला आहे. देशातील श्रीमंतांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे समोर आले आहे.
India Richer : अलीकडच्या काळात देशातील श्रीमंत लोकांच्या संख्येत वाढ (Rich People) होतोना दिसत आहे. भारत आता श्रीमंतांचा देश बनत चालला आहे. देशातील श्रीमंतांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे समोर आले आहे. 2023 मध्येच श्रीमंतांच्या संख्येत 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
2023 मध्ये भारतातील श्रीमंतांची संख्या किती?
2023 मध्ये भारतातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. ही वाढ 6 टक्के झाली आहे. या संदर्भात नाईट फ्रँक इंडियाने एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार देशात श्रीमंतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळं श्रीमंतांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असल्याचं समोर आलं आहे. अहवालातील आकडेवारी पाहिल्यास, भारतातील श्रीमंतांची संख्या वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी वाढून 2023 मध्ये 13,263 झाली आहे. देशातील वाढत्या समृद्धीमुळं 2028 पर्यंत अल्ट्रा-हाय नेट वर्थ व्यक्तींची (UHNI) संख्या सुमारे 20,000 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. UHNI म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची एकूण संपत्ती 30 दशलक्ष डॉलर किंवा त्याहून अधिक आहे.
'द वेल्थ रिपोर्ट-2024' प्रसिद्ध
द वेल्थ रिपोर्ट-2024 जारी झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील UHNI ची संख्या 2023 मध्ये 6.1 टक्क्यांनी वाढून 13,263 होईल. तर गेल्या वर्षी ही संख्या 12,495 होती. भारतातील UHNI ची संख्या 2028 पर्यंत 19,908 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
देशात संपत्ती निर्मितीमध्ये बदलाचे युग सुरू आहे. भारत सध्या जगात आर्थिक विकास आणि वाढत्या संधींचा पुरावा म्हणून उभा आहे. देशात अत्यंत श्रीमंत लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील पाच वर्षांत त्यात 50.1 टक्के वाढ अपेक्षित आहे.
चालू 2024 मध्येही मोठी वाढ होणार
नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, 2024 मध्येही सुमारे 90 टक्के भारतीय UHNI च्या संपत्तीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, 63 टक्के मालमत्तांचे मूल्य 10 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या पाच वर्षांत जागतिक स्तरावर श्रीमंतांची संख्या 28.1 टक्क्यांनी वाढून 802891 वर जाण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर UHNI ची संख्या 2023 मध्ये 4.2 टक्क्यांनी वाढून 6,26,619 होईल, जी एका वर्षापूर्वी 6,01,300 होती. ही वाढ 2022 मध्ये झालेल्या घसरणीपेक्षा खूपच जास्त आहे.
तुर्कीमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक
तुर्कीमधील श्रीमंतांची संख्या वार्षिक आधारावर सर्वाधिक 9.7 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर अमेरिकेतील श्रीमंतांची संख्या 7.9 टक्के, भारतात 6.1 टक्के, दक्षिण कोरियामध्ये 5.6 टक्के आणि स्वित्झर्लंडमध्ये 5.2 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या:
अब्जाधीशांच्या यादीत 15 भारतीय महिला, जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोणत्या देशात?