एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Indian Economy: लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर होणार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाणार

अलीकडेच आपण 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर केली जाणार आहे.

Indian Economy: सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात म्हणजे 2047 साली आपला भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणू पुढे येईल. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर असणार आहे. अलीकडेच आपण 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे. विकसित देशाचा दर्जा मिळविण्यासाठी लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर केली जाणार आहे. त्यात भारत कोणत्या मार्गांवर हे लक्ष्य साध्य करेल याचा उल्लेख आहे. 

भारताचा विकास योग्य दिशेने सुरू

NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा विकास योग्य दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये Vision India@2047 डॉक्युमेंट आणणार आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारत कोणत्या मार्गांवर, सुधारणा आणि धोरणांच्या आधारे विकसित देश बनणार आहे, याचा त्यात उल्लेख असेल असे सुब्रमण्यम म्हणाले.

सरकार उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार 

विकसित देश होण्यासाठी सरकार उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार आहे. महाविद्यालयांमधील प्रवेश सध्याच्या 27 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. कॉलेजला जाणाऱ्यांची संख्या अंदाजे 9 कोटींवर नेली जाईल. तसेच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सरकार अधिकाधिक गुंतवणूक करणार आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. अनेक नवीन विद्यापीठेही सुरू होतील. याशिवाय देशात शैक्षणिक शहरेही तयार केली जातील, जिथे संशोधन आणि नवनिर्मितीवर भर दिला जाईल. खासगी क्षेत्रालाही शिक्षण क्षेत्रात अधिक भक्कमपणे काम करण्याची संधी दिली जाईल.

तरुणांच्या शक्तीचा वापर होणार 

भारत हा तरुण देश आहे, ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. कौशल्याचे शस्त्र देऊन देशाच्या प्रगतीच्या प्रवासात ही ताकद जोडली जाईल. संपूर्ण जगाला मनुष्यबळ पुरवून भारत आपली स्थिती मजबूत करेल. सध्या 13 लाख विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिक्षणासाठी जातात. आता परदेशी विद्यार्थ्यांना येथे आणण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. तसेच उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाला चालना मिळेल.

अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे 

भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यासह भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. देश लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, ज्याची किंमत सध्या 26.7 ट्रिलियन डॉलर आहे. शेजारी देश चीनची अर्थव्यवस्था 19.24 ट्रिलियन डॉलर्स आहे. 4.39 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह जपान तिसऱ्या स्थानावर आहे आणि जर्मनी 4.28 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र, भारताचा विकास सर्वात वेगवान आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

India GDP: खरंच 4 ट्रिलियन डॉलर पार पोहोचलीये भारतीय अर्थव्यवस्था? अर्थतज्ज्ञ म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget