Hyundai चा प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल, देवेंद्र फडवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार
पुण्यात होणारा ह्युंदाईचा (Hyundai) प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.
Devendra Fadnavis : पुण्यात होणारा ह्युंदाईचा (Hyundai) प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. हा प्लांट महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. हा प्रकल्प गतिशीलता क्रांती करणारा असून, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनकडे नेणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. याबाबत ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधानांनी सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचे आभार मानले आहेत. एकत्रितपणे, आम्ही 'विकसित भारत 2047' च्या दिशेने वाटचाल करत आहोत. 'मेक इन इंडिया'च्या दिशेने वेगानं वाटचाल सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Hyundai मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष, Euisun Chung यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी औद्योगिक क्रांतीसंदर्भात संबंधित विषयांवर चर्चा केली. भारताच्या बाजारपेठेमुळे आणि सुधारणावादी दृष्टिकोनामुळे, Hyundai भारतासोबत काम करण्यास प्राधान्य देते असल्याचे Euisun Chung यांनी म्हटलं आहे. Euisun Chung यांनी माननीय पंतप्रधानांना पुणे, महाराष्ट्र येथे ह्युंदाई प्लांटच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही भारत सरकारचे आभारी असल्याचे Euisun Chung यांनी म्हटले आहे. भारत सरकार या प्लांटशी संबंधित सर्व बाबींसाठी महाराष्ट्राला सहकार्य करेल असंही सांगितलं.
महत्वाच्या बातम्या: