(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोहा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर विजयी, ठाकरे गटाच्या एकनाथ पवारांचा पराभव
लोहा विधानसभा मतदारसंघून (Loha Assembly constituency) अजित पवार गटाचे प्रतापराव चिखलीकर विजयी झाले आहेत.
Loha Vidhansabha Election Result 2024 : नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांचा पराभव झाला आहे. चिखलीकर यांचा लोकसभेला पराभव झाला होता. त्यानंतर ते लोहा मतदारसंघातून उभे राहिले होते. अखेर त्यांचा विजय झाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी आज आपण लोहा विधानसभा मतदारसंघ (Loha Assembly constituency) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. सध्या या मतदारसंघातून भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे आमदार आहेत.
2019 च्या निवडणुकीत लोहा विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?
लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. पण लोहा नांदेड जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे श्यामसुंदर शिंदे विजयी झाले होते. त्यांना 1,01,668 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शिवकुमार नारायणराव नारंगळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर 92,435 मते मिळवून विजयी झाले होते. तर त्यावेळी भाजपा पक्षाचे केशवराव धोंडगे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
यावेळी नेमकं काय होणार?
यावेळी राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. त्यामुळं मतांचं विभाजन झालं आहे. त्यामुळं निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी शेकापकडून पुन्हा श्यामसुंदर शिंदे हे इच्छुक आहेत.
तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात प्रतापराव पाटील चिखलीकर इच्छुक आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. आता ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता महायुती नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर महाविकास आघाडी देखील काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोहा मतदारसंघात बेरोजगारीचं प्रमाण जास्त रोजगाराची मोठी समस्या
लोहा विधानसभा मतदारसंघात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहे. या मतदारसंघात मोठे उद्योग नाहीत. नोकरीसाठी तरुणांना पुणे, हैदराबाद, मुंबई, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी जावं लागतं. त्यामुळं या ठिकाणी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण व्हाव्यात अशी मागणी मतदारसंघातील लोक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: