एक्स्प्लोर

Hurun Rich List 2025: मुकेश अंबानी पुन्हा भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी; 358 अब्जाधीशांचा नवा विक्रम, शाहरुख खानही अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील

Hurun India Wealth Report 2025: मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर या वर्षी भारतातील अब्जाधीशांची संख्या 358 पर्यंत वाढली आहे, जी आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे.

M3M Hurun India Rich List 2025 : एम 3 एम आणि हुरुन इंडियाने बुधवारी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी (M3M Hurun India Rich List 2025) जाहीर केली. ही यादी देशातील अव्वल अब्जाधीश आणि नवीन उद्योजकांच्या नावांची घोषणा केली आहे. एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 च्या 14व्या आवृत्तीनुसार, या वर्षी भारतातील अब्जाधीशांची संख्या 358 पर्यंत वाढली आहे, जी आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे.

दरम्यान, देशातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबाने भारतातील सर्वात श्रीमंत म्हणून पुन्हा आपले स्थान मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती 9.55 लाख कोटी रुपये आहे. तर त्यानंतर गौतम अदानी (Gautam Adaniआणि त्यांचे कुटुंब 8.15 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह त्यांच्या खालोखाल स्पर्धेत आहे. पहिल्या तीनमध्ये उल्लेखनीय पदार्पण करत रोशनी नादर मल्होत्रा ​​आणि त्यांचे कुटुंब 2.84 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. प्रकाशित अहवालात असे दिसून आले आहे की, नवीन प्रवेश करणारे देशाच्या संपत्तीच्या लँडस्केपमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत.

टॉप रिच लिस्ट (M3M Hurun India Top Rich List 2025)

मुकेश अंबानी आणि अंबानी कुटुंब पुन्हा एकदा इंडिया रिच लिस्ट 2025 च्या यादीत ₹9.55 लाख कोटी ($105 अब्ज) च्या एकूण संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे. तर गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब ₹8.15 लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोशनी नादर मल्होत्रा ​​यांनी पहिल्यांदाच टॉप तीनमध्ये स्थान मिळवून इतिहास रचला. ₹2.84 लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह, त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आणि टॉप 10 मधील सर्वात तरुण सदस्य बनल्या आहते. एआय स्टार्टअप परप्लेक्सिटीचे संस्थापक अरविंद श्रीनिवास हे ₹21, 190 कोटींच्या एकूण संपत्तीसह सर्वात तरुण अब्जाधीश ठरले. तर नीरज बजाज आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची संपत्ती 43% ने वाढवून ₹2.33 लाख कोटी केली, ज्यामुळे यादीत ते सहाव्या स्थानावर पोहोचले.

श्रीमंतांच्या यादीतील इतर प्रमुख नावे (Other Prominent Names on the Rich List)

दरम्यान, श्रीमंतांच्या यादीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. त्यांची संपत्ती अंदाजे ₹12,490 कोटी इतकी होती. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या शेअरमध्ये 124% वाढ झाल्यानंतर ते पुन्हा अब्जाधीश झाले. तर झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे 5.9 अब्ज डॉलर्सच्या कंपनीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत आणि त्यांचे भागीदार आदित पलिचा हे यादीत स्थान मिळवणारे दुसरे सर्वात तरुण अब्जाधीश आहेत.

अब्जाधीशांच्या यादीत सर्वाधिक नोंद मुंबईमध्ये (Mumbai has the highest Number of billionaires)

महत्वाचे म्हणजे या वर्षी, ₹1,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या 1,687 व्यक्तींचा समावेश करण्यात आला. ज्यामध्ये 284 नवीन नावे समाविष्ट आहेत. यादीतील व्यक्तींनी दररोज सरासरी ₹1,991 कोटींची संपत्ती मिळवली. त्यातील मुंबईमध्ये सर्वाधिक 451 नोंदी होत्या, त्यानंतर दिल्ली (223) आणि बेंगळुरू (116) यांचा क्रमांक लागतो. प्रामुख्याने यात 101 महिलांनी यादीत स्थान मिळवले आहे. ज्यात 26 डॉलर अब्जाधीशांचा समावेश आहे. यादीतील 66% महिला स्वयंनिर्मित आहेत.

क्षेत्रनिहाय ट्रेंड

औषध उद्योग (137) सर्वात श्रीमंत व्यक्ती निर्माण करत राहिले, त्यानंतर औद्योगिक उत्पादने (132) आणि रसायने आणि पेट्रोकेमिकल्स (125) यांचा क्रमांक लागतो. बायोटेक क्षेत्रानेही चांगली कामगिरी केली.

“एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 ही भारताच्या उल्लेखनीय संपत्ती निर्मिती प्रवासाचे प्रतीक आहे. या यादीत नवोपक्रम, उद्योजकता आणि चिकाटीद्वारे देशाच्या प्रगतीला आकार देणाऱ्या दूरदर्शी व्यक्तींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, रिअल इस्टेट क्षेत्राने आपली ताकद सिद्ध केली आहे. यात 99 नेते आहेत, ज्यात 23 पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्यांचा समावेश आहे. केवळ या क्षेत्रानेच 8.72 लाख कोटी रुपयांची संपत्ती जोडली आहे. महिला आणि पहिल्या पिढीतील उद्योजकांचे वाढते योगदान हे दर्शविते की रिअल इस्टेट आता विविधता आणि स्वावलंबनाचे एक शक्तिशाली प्रतीक बनले आहे.”

M3M Hurun India Rich List 2025 : देशाची प्रगती आणि सावधगिरी दोन्ही प्रतिबिंबित करते

“M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 (M3M Hurun India Rich List 2025) ही देशाची प्रगती आणि सावधगिरी दोन्ही प्रतिबिंबित करते. भारतातील श्रीमंतांची एकूण संपत्ती 167 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल्स, दागिने आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतात आता 358 डॉलर अब्जाधीश आहेत, ज्यांच्याकडे जीडीपीच्या जवळजवळ अर्ध्या एवढी संपत्ती आहे. या यादीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे 66% व्यक्ती स्वयंनिर्मित आहेत आणि 74% नवीन उद्योजक पहिल्या पिढीतील आहेत. संपत्ती आता 91 शहरांमध्ये पसरलेली आहे, जी भारताची व्यापक आणि संतुलित आर्थिक प्रगती दर्शवते.” असे मत हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनिद यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरीत, M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 दर्शवते की भारत केवळ पारंपारिक उद्योगांमध्येच नव्हे तर स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि बायोटेकमध्ये देखील जागतिक स्तरावर वेगाने संपत्ती निर्माण करत आहे. भारतातील श्रीमंतांची संख्या जागतिक स्तरावर एका नवीन भारताची कहाणी लिहित आहे.

हेही वाचा

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget