एक्स्प्लोर

2022 Hurun global rich list : मुकेश अंबानींचा अटकेपार झेंडा, टॉप 10 श्रीमंताच्या यादीत एकमेव भारतीय

Hurun Global Rich List 2022 : नुकतीच हुरून ग्लोबल रिच यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टॉप 10 मध्ये मुकेश अंबानी यांची वर्णी लागली आहे.

Hurun Global Rich List 2022 : नुकतीच हुरून ग्लोबल रिच यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टॉप 10 मध्ये मुकेश अंबानी यांची वर्णी लागली आहे. टॉप 10 मध्ये असणारे मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला, डीमार्टचे संस्थापक आर. के दमानी आणि स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल या तीन जणांचाही हारुन ग्लोबल रिचच्या अव्वल 100 जणांच्या यादीत समावेश झाला आहे. 

रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी जगातील अव्वल दहा अब्जाधीशांच्या यादीत असणारे एकमेव भारतीय आहेत. हुरून आणि रिअल इस्टेट ग्रुप M3M यांनी मिळून जगातील श्रीमंताची यादी तयार केली आहे. The 2022 M3M Hurun Global Rich List असे रिपोर्ट्सचे नाव आहे. अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये जगात सर्वाधिक वाढ होत असल्याचेही या यादीत म्हटलेय.  2021 मध्ये अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये 49 अब्ज डॉलरमध्ये वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या रिन्यूअबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीनच्या लिस्टिंगनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.  अदानी यांची संपत्ती 17 अब्ज डॉलरवरुन 81 अब्ज डॉलर इतकी झाली. मुकेश अंबानी यांच्यानंतर 69 वर्षीय अदानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हुरुन यांच्या रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 133 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 24 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे गौतम अदानीच्या संपत्तीमध्ये 2021 मध्ये 153 टक्के वाढ पाहायला मिळाली. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी 12 व्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत. 

SpaceX आणि Tesla चे संस्थापक  एलॉन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. Amazon चे जेफ बेजोस (Jeff Bezos) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर LVMH चे Bernard Arnault तिसऱ्य क्रमाकावर आहेत.  नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायरही 7.6 अब्ज डॉलर संपत्तीसह हारून ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये पोहचल्या आहेत. भारतातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी 103 कोटी अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.तर 81 अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवनाडार आणि फेमली 28 अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सायरस पुनावाला 26 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. 25 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह लक्ष्मी मित्तल पाचव्या क्रमांकावर आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
NCMC Card : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एनसीएमसी कार्डचा रिचार्ज  5 रुपयांच्या पटीत करता येणार, नवी अपडेट जाणून घ्या
NCMC कार्डच्या रिचार्जच्या नियमात मोठा बदल, एसटी प्रवाशांना दिलासा
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Embed widget