झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन किती कोटींचे मालक? 'या' योजनांमध्ये केली आहे गुंतवणूक
Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्याकडे किती संपत्ती आहे. त्यांची गुंतवणूक नेमकी कोणत्या योजनांमध्ये आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री (Jharkhand) हेमंत सोरेन (Hemant Soren) हे सध्या चर्चेत आहेत. कारण, कथित जमीन फसवणूक प्रकरणी आज त्यांची ईडी चौकशी (ED) होणार आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज दुपारी 1 वाजता चौकशी होणार आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्याकडे किती संपत्ती आहे. त्यांची गुंतवणूक नेमकी कोणत्या योजनांमध्ये आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. MyNeta.com वर उपलब्ध माहितीनुसार, झारखंड मुक्ती मोर्चा नेते (JMM) हेमंत सोरेन यांच्याकडे 8,51,74,195 रुपयांची एकूण संपत्ती आहे.
कुठे केली आहे गुंतवणूक?
हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. त्यांच्या बँक खात्यात सुमारे 25 लाख रुपये जमा आहेत. सोरेन आणि त्यांच्या पत्नीकडे अंदाजे 7,24,612 रुपये किमतीचे शेअर्स, बाँड आणि डिबेंचर्स आहेत. JMM नेत्याने 26,81,589 रुपयांच्या पोस्ट ऑफिस योजना देखील निवडल्या आहेत. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि ICICI योजनांमध्ये 70,05,638 रुपयांची गुंतवणूक केली. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2,84,220 रुपयांचे दायित्व घोषित केले आहे. 2018-19 मध्ये त्यांनी 13.37 लाख रुपये वैयक्तिक उत्पन्न घोषित केले. तर 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, हेमंत सोरेन यांच्याकडे एक टाटा सफारी कार आहे, जी त्यांनी 13 लाख रुपयांना खरेदी केली होती. तर एक हॅचबॅक कार आहे. सोरेन यांच्या पत्नीच्या नावावर मारुती सियाझ कार आहे.
हेमंत सोरेन यांच्याकडे सोने-चांदी नाही
हेमंत सोरेन यांच्या नावावर सोन्या-चांदीची कोणतीही वस्तू नाही. प्रतिज्ञापत्रानुसार, सोरेनची यांची पत्नी कल्पना यांच्याकडे 24 लाख रुपये किमतीचे 655 ग्रॅम सोने आणि 9 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सुमारे 20 किलो चांदी आहे. त्यांच्याकडे 55 हजार रुपयांची रायफलही आहे. हेमंत सोरेन यांच्याकडे बोकारो आणि अंगारा रांची येथे 22 लाख रुपयांचे दोन भूखंड आहेत. त्यांच्या नावावर बोकारोमध्ये 75 लाख रुपयांचे घर आणि 19 लाख रुपयांची इतर मालमत्ताही आहे. याबाबतची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती. सोरेन यांच्या पत्नीकडे 4,87,00,000 रुपयांच्या तीन व्यावसायिक इमारती आहेत.
दुपारी 1 वाजता चौकशी होणार
झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं आहे. आज दुपारी 1 वाजता चौकशी होणार आहे. ईडी पथकाने सोमवारी हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली, मात्र त्यावेळी सोरेन तिथे उपस्थित नव्हते. हेमंत सोरेन मागील 40 तासांपासून गायब होते, त्यानंतर आता ते ईडीसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक मंगळवारी हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. ईडीने बंगल्यातून हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापेमारी करण्यात आली. ईडीने नोटीस जारी केल्यानंतर 29 जानेवारीपासून सोरेन संपर्कात नव्हते. या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन निवासस्थानी उपस्थित नव्हते. दरम्यान, ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून मोठी रोकड जप्त केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; जमीन घोटाळ्याचा कथित आरोप