एक्स्प्लोर

GST Rate Cut: मोदी सरकारचा दिवाळी धमाका! मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न होणार साकार, GST मुळे मिळणार मोठा दिलासा

GST Rate Cut: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांना दिलेला शब्द पाळण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

GST Rate Cut: जीएसटी प्रणाली लागू होऊन तब्बल आठ वर्षे झाली असून, दरम्यान केंद्र सरकारने या कर प्रणालीत वेळोवेळी काही किरकोळ बदल केले. मात्र आता मोदी सरकारने जीएसटी प्रणाली अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांसाठी सोपी करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांना दिलेला शब्द पाळण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने 12 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त घोषित करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करून आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला. आता केंद्र सरकार जीएसटी प्रणाली सुलभ करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे.

सध्या विविध वस्तूंवर वेगवेगळ्या टक्केवारीचे कर (स्लॅब) लागू आहेत, जसे की 5%, 12%, 18% आणि 28%. या व्यवस्थेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो तसेच वस्तूंच्या किंमतींवरही परिणाम होतो.

फक्त दोन मुख्य स्लॅबचा प्रस्ताव

सरकारने आता फक्त दोन स्लॅब - 5% आणि 18% - लागू करण्याचा विचार केला आहे. याशिवाय, लक्झरी आणि हानिकारक उत्पादनांवर 40% विशेष कर आकारण्यात येईल. गुरुवारी झालेल्या GoM (Group of Ministers) च्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.

हा निर्णय 3 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अंतिम करण्यात येईल. सरकारच्या मते, यामुळे करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी होणार असून टॅक्स अनुपालनही वाढेल.

रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा?

या प्रस्तावित बदलांचा थेट परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर होऊ शकतो. सध्या घर बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंवर वेगवेगळे जीएसटी दर लागू आहेत:

सिमेंट – 28%

स्टील – 18%

पेंट – 28%

टाइल्स व सॅनिटरी वेअर – 18%

या उच्च दरांमुळे विकासकांचा खर्च वाढतो आणि परिणामी घरांच्या किमतीही वाढतात. मात्र, कर स्लॅबमध्ये एकसमानता आणल्यास आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) परत आणल्यास, घरांच्या किमती २-४% नी घटू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे बदल विशेषतः मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण सध्या वाढत्या खर्चामुळे त्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

देशाच्या तिजोरीत मोठी भर, परकीय चलनसाठ्यात 1.48 अब्ज डॉलर्सची वाढ, RBI ने जाहीर केली आकडेवारी

कोणत्याही धोक्याशिवाय मिळणार 7 लाख रुपये, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे धमाकेदार योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget