GST Collection : जीएसटीचे विक्रमी संकलन; 9 महिन्यात 15 लाख कोटींचा कर जमा, सरकारकडून आकडेवारी जाहीर
GST Collection : डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये झाले. डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.
GST Collection : देशात जीएसटी संकलनात (Gross GST Collection) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले असून 14.97 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये झाले. डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. 2023 मधील 10 महिन्यांसाठी जीएसटी संकलनाचा आकडा 1.5 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
अर्थ मंत्रालयाने नवीन वर्षात जीएसटीची (वस्तू आणि सेवा कर) आकडेवारी जाहीर केली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते. डिसेंबरमध्ये हा आकडा 1.65 लाख कोटी रुपये होता. जो मासिक आधारावर सुमारे दोन टक्के कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत जीएसटी संकलनाचे आकडे सातत्याने वाढत आहेत. अर्थ मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जीएसटी संकलनाची मासिक सरासरी 1.66 लाख कोटी रुपये आहे.
👉 Posting a growth rate of 12% Y-o-Y, ₹14.97 lakh crore gross #GST collection during April-December 2023 period⁰⁰👉 Gross #GST collection averages ₹1.66 lakh crore in first 9 months of FY24⁰⁰👉 ₹1,64,882 crore gross #GST revenue collection for December, 2023
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 1, 2024
Read more ➡️… pic.twitter.com/obNCxO50nZ
2020-21 या आर्थिक वर्षात GST संकलनात वाढ
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाची मासिक सरासरी 1 लाख कोटी रुपये होती. कोविड-19 महासाथीनंतर 2020-21 या आर्थिक वर्षात त्यात वाढ होऊ लागली. यानंतर 2022-23 या आर्थिक वर्षात मासिक सरासरी 1.51 लाख कोटी रुपये होती.
एकूण जीएसटी संकलनात 12 टक्क्यांची वाढ
एप्रिल ते डिसेंबर दरम्यान वार्षिक आधारावर एकूण जीएसटी संकलनात 12 टक्क्यांनी वाढ झाली आणि ती 14.97 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत एकूण जीएसटी संकलनाचा आकडा 13.40 लाख कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत एकूण जीएसटी संकलन 1.66 लाख कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा 1.49 लाख कोटी रुपये होता.
एकात्मिक जीएसटी 84,255 कोटी रुपये
डिसेंबरमध्ये केंद्रीय जीएसटी 30,443 कोटी रुपये, राज्य जीएसटी 37,935 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 84,255 कोटी रुपये आणि उपकर 12,249 कोटी रुपये होता. एकात्मिक जीएसटीपैकी सरकारने केंद्रीय जीएसटीला 40,057 कोटी रुपये आणि राज्य जीएसटीला 33,652 कोटी रुपये दिले. यामुळे डिसेंबरमध्ये केंद्रीय जीएसटीचा एकूण महसूल 70,501 कोटी रुपये आणि राज्य जीएसटीचा 71,587 कोटी रुपयांचा हिस्सा होता.