Gold Silver Reserve : भारत, अमेरिका, चीन नव्हे तर 'या' देशाकडे सर्वाधिक सोनं; तर आफ्रिकेतील मागास देशाकडे चांदीचा सर्वाधिक साठा
Gold Silver Reserve In India : महागाई, युद्ध, डॉलरमधील अस्थिरता आणि जागतिक राजकीय तणावाच्या काळात सोने आणि चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.

Gold Silver Reserve Major Countries : जगभरातील अर्थव्यवस्था अस्थिर होत असतानाच लोक आणि सरकार दोघेही सोने (Gold) आणि चांदी (Silver) या धातूंना सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत. ब्रिटनच्या नाणी बनवणाऱ्या कंपनी ‘रॉयल मिंट’ (Royal Mint) च्या अहवालानुसार, सोने ही केवळ स्थैर्य (Stability) देणारी संपत्ती नाही, तर ती महागाईपासून संरक्षण (Protection from Inflation) करते आणि आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षिततेची हमी देते.
सोने आणि चांदी यांचा प्रभाव मानवजातीवर अतिप्राचीन काळापासून आहे. केवळ दागिन्यांसाठी नव्हे, तर लोक या धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक (investment) करतात. फक्त सामान्य नागरिक नव्हे, तर सरकाराही आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सोन्याचे भांडार वाढवण्यावर भर देतात.
आर्थिक अस्थिरता किंवा राजकीय संकटे आल्यावर लोक कागदी चलनाऐवजी सोने-चांदीत गुंतवणूक करतात. कारण या धातूंची किंमत कायम राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते.
Major Gold Reserves : जगातील सोन्याचे प्रमुख भांडार
जगात सर्वाधिक सोन्याचे भांडार रशिया (Russia) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या देशांमध्ये आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार रशियातील सायबेरिया आणि ऑस्ट्रेलियातील पश्चिम ऑस्ट्रेलिया भागात मोठ्या प्रमाणावर सोने उत्खनन (gold mining) होते.
2024 मध्ये, रशियाचे वार्षिक सोन्याचे उत्पादन सुमारे 310 मेट्रिक टन इतके होते. तर ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे 12,000 मेट्रिक टन सोन्याचा संच आहे, आणि दरवर्षी 320 ते 330 टन सोन्याचे उत्पादन होते.
त्यानंतर कॅनडा (Canada) आणि चीन (China) या देशांचा क्रमांक लागतो. या देशांकडे अनुक्रमे 3,200 टन आणि 3,100 टन सोन्याचे संच आहे. अमेरिकेकडे (USA) सुद्धा सुमारे 3,000 मेट्रिक टन सोन्याचा मोठा संच आहे.
Gold Reserve In India : भारताकडे किती सोन्याचा साठा?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च 2025 पर्यंत भारताकडे सुमारे 879.6 टन सोन्याचा साठा आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात (foreign exchange reserves) त्याचा हिस्सा जवळपास 11.70 टक्के इतका आहे.
Silver Reserve In India : भारतातील चांदीचा साठा किती?
चांदीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा साठा पेरू (Peru) या देशात आहे, तो अंदाजे 1,40,000 मेट्रिक टन इतका आहे. त्यानंतर रशिया सुमारे 92,000 टन, चीन 70,000 टन, पोलंड 61,000 टन, आणि मेक्सिको जवळपास 37,000 टन चांदीचा साठा बाळगून आहे.
भारतातील Indian Bureau of Mines (IBM) च्या 2021 च्या अहवालानुसार, देशात एकूण 30,267 मेट्रिक टन इतका चांदीचा साठा आणि संसाधन आहे. त्यापैकी 7,707 मेट्रिक टन हा प्रत्यक्ष साठा आहेत, तर 22,560 मेट्रिक टन हे संसाधनाच्या स्वरुपात आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सोनं आणि चांदी ही केवळ दागिन्यांची धातू नसून, ती भविष्यासाठी सुरक्षित मालमत्ता (Safe Haven Assets) आहेत. महागाई, युद्ध, डॉलरमधील अस्थिरता आणि जागतिक राजकीय तणावाच्या काळात या दोन्ही धातूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.


















