एक्स्प्लोर

Gold Silver Price Today: FD मोडून लोक धावतायत सोन्या-चांदीकडे! सुवर्णनगरीत नवनवे उच्चांक, आज सोनं- चांदी किती रुपयांवर?

कमी व्याजदरामुळे बँकांतील गुंतवणूक तोट्याची ठरत असल्याचं जाणवत असल्याने अनेकांनी आपल्या मुदतठेवी मोडून सोनं-चांदीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gold silver Rates today: देशात एकीकडे बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात सातत्याने कपात होत असताना, दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरात दररोज नवे उच्चांक गाठले जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्ण नगरीत सोनं-चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर होत आहे. कमी व्याजदरामुळे बँकांतील गुंतवणूक तोट्याची ठरत असल्याचं जाणवत असल्याने अनेकांनी आपल्या मुदतठेवी मोडून सोनं-चांदीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.( Gold Silver Price)

जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकेच्या नव्या आर्थिक धोरणांचा परिणाम आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोनं-चांदीच्या दरात ही प्रचंड वाढ होत आहे. गेल्या काही आठवड्यांत सोनं-चांदीच्या किमतीत झालेल्या उसळीमुळे जळगावसह राज्यभरातील बाजारपेठा चांगल्याच तापल्या आहे. दररोज बदलणारे दर, वाढता गुंतवणूकदारांचा ओघ आणि बाजारातील बदलती मानसिकता यामुळे सोनं-चांदीचा हा ट्रेंड नेमका कसा आहे, कोणाला फायदा होतोय, कोणावर परिणाम होतोय आणि यामागची कारणं काय आहेत? पाहूया 

सोन्याचांदीचे आजचे दर किती ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी विविध देशांसंदर्भात राबवलेल्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्याचा विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची वाढ झाली असून, आज जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, 1 लाख 11 हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर थेट 3 लाख 32 हजार रुपयांवर गेला आहे.या दरवाढीचा थेट फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. अवघ्या एका महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीत सुमारे 14 टक्के तर चांदीत तब्बल 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झाल्याचं चित्र आहे. एकूणच, बँक व्याजदरातील घट आणि मौल्यवान धातूंमधील वाढता परतावा यामुळे जळगावसह राज्यभरात सोनं-चांदी गुंतवणुकीचा ट्रेंड पुन्हा जोर धरताना दिसत आहे.

बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅममागे असणारा दर 156,700 रुपये एवढा आहे. तर एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 335,420 रुपये मोजावे लागत आहेत. 

सोन्या चांदीच्या वाढीमागची कारणं काय?

किंमतींमध्ये झालेल्या या नाट्यमय वाढीमागे अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय घटकांचा उल्लेख केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रीनलँड संकट आणि त्याशी संबंधित भू-राजकीय तणाव, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा युद्ध किंवा मोठ्या संघर्षाचा धोका वाढतो तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या धोकादायक गुंतवणुकीतून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात. याला सुरक्षित आश्रय मागणी म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना मोठा आधार मिळाला आहे.

अमेरिकन डॉलरची कमकुवतता आणि जपानी सरकारी रोख्यांमध्ये झालेली घसरण देखील सोन्याची चमक वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेव्हा चलने आणि रोखे कमकुवत होतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. दरम्यान, कर आणि अमेरिका आणि युरोपमधील संभाव्य व्यापार युद्धाची भीती यामुळे बाजारात भीतीची भावना निर्माण झाली आहे. मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार जोखीम घेण्याऐवजी सोन्यात त्यांची गुंतवणूक वाढवत आहेत, ज्यामुळे मागणी सातत्याने जास्त राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget