Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ! सोने-चांदी खरेदी आधी आजचा भाव जाणून घ्या
Gold Price Today : गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Silver Rate Today, 28 December 2023 : वर्षाच्या शेवटी सोने-चांदी खरेदी (Gold Price Today) करण्याच्या विचारात असाल तर, आज सोन्याचा चांदीचा भाव (Silver Price Today) काय आहे हे जाणून घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात 430 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत 430 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे.
सोन्याच्या दरात चढ-उतार कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून लग्नसराईच्या काळात सोन्याला चांगली झळाळी मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या मोठा बदल झाला आहे.
सोन्याच्या दरात वाढ (Gold Silver Price)
आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) 430 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5890 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6425 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 48,190 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,250 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय? (Silver Price Today)
आज चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 79,500 रुपये प्रति किलो आहे.
देशातील चार प्रमुख महानगरांमधील सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 450 रुपयांनी महागली असून आजचा सोन्याचा दर 64850 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 81000 रुपयांवर पोहोचली आहे.
- दिल्लीत सोनं 440 रुपयांनी महागलं असून आज सोन्याची किंमत 64400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 79500 रुपये प्रति किलो आहे.
- मुंबईत सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली असून आज सोन्याचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 79500 रुपये आहे.
- कोलकातामध्ये सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली असून आजचा सोन्याचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 79500 रुपयांवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
नाशिक - 24 कॅरेट सोने 64280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
नागपूर - 24 कॅरेट सोने 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार का होतो?
सोने आणि चांदीच्या किमतीवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. सोन्याची जगभरातील मागणी, देशांमधील चलन मूल्यांमधील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंबंधीचे सरकारी नियम यासारखे घटक या बदलांमध्ये भूमिका बजावतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची क्षमता यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडतो.